Cotton mill  sakal media
मुंबई

गिरण्यांच्या चाळींचे पुनर्वसन; केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार

चार हजार घरे मिळण्याची शक्यता

कृष्ण जोशी

मुंबई : मुंबईतील खासगी व एनटीसीच्या कापड गिरण्यांच्या (cotton mill) चाळींच्या पुनर्वसनाबाबत (chaul redevelopment) नुकतीच संबंधितांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली असून याबाबतचा प्रस्ताव (proposal) लवकरच केंद्राकडे पाठविण्याचे ठरले. या पुनर्वसनातून चार हजार घरे मिळण्याची शक्यता आहे. या जुन्या चाळींच्या पुनर्विकासाबाबत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिन अहिर (sachin Ahir) आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते (Govindrao mohite) यांनी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad) यांच्याकडे बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार झालेल्या बैठकीस एनटीसीचे कार्यकारी प्रमुख मनोज कुमार (manoj kumar) तसेच सेंच्युरी, बॉम्बेडाइंग, खटाव, मफतलाल, मॉर्डन आदी खाजगी मिलचे वरिष्ठ, सबंधित खात्यांचे अधिकारी, रा. मि. म. संघाचे निवृत्ती देसाई व बजरंग चव्हाण आदी उपस्थित होते.

या गिरण्यांच्या चाळी जुन्या झाल्याने त्यांची अवस्थाही धोकादायक झाली आहे, असेही अहिर यांनी दाखवून दिले. या चाळींचा म्हाडामार्फत पुनर्विकास व्हावा, अशी मागणीही अहिर यांनी यापूर्वी केली होती. या पुनर्विकास योजनेला एनटीसी च्या वरिष्ठांनी सहमती दर्शवली. केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री पियुष गोयल यांच्याबरोबर चर्चा करण्याचे ठरविण्यात आले. खासगी गिरण्यांच्या प्रतिनिधींनीही आपला प्रस्ताव येत्या आठ दिवसात गृहनिर्माण मंत्र्यांकडे सादर करण्याचे मान्य केले. मुंबई विकास नियंत्रण नियमावली 1991 अंतर्गत खाजगी मालक किंवा एन. टी. सी. या चाळींच्या संपूर्ण जमिनीवर पुनर्वसन करु शकत नाही. परंतु नियमानुसार जे कामगार एक 2000 पर्यंत चाळीमध्ये रहात होते, त्यांना 405 चौरस फुटांचे घर देणे बंधनकारक आहे. सर्वांनी सहकार्य केले तर चार हजार पेक्षा जास्त घरे मिळतील, असा अंदाजही यावेळी व्यक्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict: अमेरिका-इराणचं पुन्हा पेटलं! यूएसच्या तळांवर इराणने डागले क्षेपणास्त्र; दोन्ही देशांमधला युद्धविराम धोक्यात

Karad Crime : वैवाहिक वादातून पत्नीने भावाच्या मदतीने अभियंता पतीला कट रचून संपविले

Kuno Viral animal : दशकांनंतर कूनोच्या जंगलात दिसला रहस्यमयी 'प्राणी! कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाली पहिली झलक, मुख्यमंत्र्यांनी शेअर केले photo

मोदी सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला; यशोमती ठाकूरांचा हल्लाबोल, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अमरावतीत मशाली पेटल्या

Nasrapur Crime Case : नसरापूर प्रकरणातील न्यायवैद्यक तज्ज्ञांची साक्ष पूर्ण; सोमवारी उलटतपासणी

SCROLL FOR NEXT