Cough-Syrup-Crime 
मुंबई

कुरियर कंपनीत सापडल्या कफ सिरपच्या बाटल्या; पोलिसही चक्रावले

रशिद इनामदार

तपासानंतर प्रकरण उघडकीस आलं अन् साऱ्यांनाच बसला धक्का

मानखुर्द: गोवंडीच्या (Govandi) शिवाजीनगर पोलिसांनी शीव (Sion) येथून अंमली पदार्थ मिश्रित कफ सिरफच्या (Cough Syrup) बाटल्या शनिवारी रात्री जप्त केल्या. या प्रकरणी रहीम शेख (Rahim Shaikh) उर्फ कुबड्या (वय ३२) व मोहित खान (Mohit Khan) याला पोलिसांनी अटक केली. या दौघांकडून सहा लाख चौदा हजार रुपये किमतीच्या १ हजार ५२६ बाटल्या (Bottles Seized) जप्त करण्यात आल्या. पोलीस नाईक प्रशांत पुजारी यांनी याविषयी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, गोवंडी पोलिसांनी ही धडक कारवाई केली.

या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी कुबड्या याची शिवाजीनगर पोलीसांनी कसून चौकशी केली. त्या चौकशी दरम्यान कुबड्याने महत्त्वाची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, कुरियरच्या माध्यमातून खाजगी ट्रॅव्हल्समधून कोडियन नावाच्या अंमली पदार्थ मिश्रित सिरपच्या बाटल्या येत असल्याची माहिती दिली होती. त्या माहितीच्या आधारे पूर्व द्रुतगती मार्गावरील शीव येथील कुरियर कंपनीच्या कार्यालयात तपासणी केली. त्यावेळी सिरपच्या बाटल्या जप्त करत कुरियर स्वीकारणारा मोहित याला अटक करण्यात आली. कुरियर कंपनी तसेच संबंधित व्यक्तींची चौकशी आणी या प्रकरणाचा तपास शिवाजी नगर पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT