मुंबई

मुंबईत कोव्हॅक्‍सिन'ची अंतिम चाचणी सोमवारपासून सुरू; एक हजार लसी हैदराबादहून येणार

भाग्यश्री भुवड


मुंबई : जगभरातील देशांचे लक्ष लागलेल्या कोरोना लसीच्या अंतिम चाचणीला सोमवारपासून (ता. 7) पालिकेच्या शीव रुग्णालयात सुरुवात होणार आहे. जवळपास एक हजार लसीच्या कुप्या हैदराबादहून मुंबईत दाखल होणार आहेत. शीव रुग्णालयात या कुप्या दाखल झाल्या की सोमवारपासून लस स्वयंसेवकांना दिली जाईल, असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. सध्या हैदराबादहून एक हजार कुप्या निघाल्या असून, 300 स्वयंसेवकांना ही लस टोचली जाईल. त्यासाठी 300 लोकांची निवड केली आहे. 

भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली कोव्हॅक्‍सिन एक हजार स्वयंसेवकांना दिली जाणार असून, आतापर्यंत 300 स्वयंसेवकांची नोंद केल्याचे त्यांनी सांगितले. स्वयंसेवकांना दिल्या गेलेल्या लसीचा कुठलाही परिणाम झाला नाही तर तो अहवाल भारत बायोटेक कंपनीला पाठवण्यात येणार आहे. कंपनीने चाचणी यशस्वी झाल्याचे स्पष्ट करताच जगभरात कोरोना लसीचे वितरण भारतातून करण्यात येणार आहे. दरम्यान, शीव रुग्णालयात अंतिम चाचणी यशस्वी झाल्यानंतर प्रथम रुग्णालय स्टाफ जे कोरोनाशी संबंधित प्रत्यक्ष काम केले अशा लोकांनी ही लस दिली जाईल. त्यानंतर मुंबईत ही लस उपलब्ध होईलच; पण सीरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जगभरात या लसीचे वितरण करण्यात येईल. हैदराबादहून येणाऱ्या लसीच्या कुप्या शनिवारी मुंबईत दाखल होतील; मात्र दोन दिवस सुट्टी असल्याने सोमवारपासून चाचणी सुरू केली जाईल, असे डॉ. जोशी यांनी सांगितले. 

covaxin last testing will held in mumbai from monday 

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sankeshwar Banda Road Toll Plaza : संकेश्वर -बांदा रोडवरील आजऱ्याचा टोल हलणार; नितीन गडकरींचे आदेश, प्रकाश आबिटकरांनी दिली माहिती

१० वर्षांच्या भावाने शतक ठोकताच श्रीलंकेतून वैभव सूर्यवंशीची मोठी प्रतिक्रिया; इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हणाला...

पेंच व्याघ्र प्रकल्पात AI आधारित 'टायगर अलार्म सिस्टम'; वाघ येण्याआधी सायरन वाजणार; नेमकी यंत्रणा काय?

Latest Marathi News Live Update : भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचाल करणे दुचाकी स्वराला उडवलं, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

आणखी एका मराठी अभिनेत्रीची 'धमाल ४' मध्ये एंट्री; करणार अजय देवगनसोबत काम, भूत बनलेल्या अभिनेत्रीला ओळखलंत का?

SCROLL FOR NEXT