सायन रुग्णालयात "कोव्हॅक्‍सिन'ची चाचणी होणार; लसीकरणासाठी भारत बायोटेककडून निवड 
मुंबई

सायन रुग्णालयात "कोव्हॅक्‍सिन'ची चाचणी होणार; लसीकरणासाठी भारत बायोटेककडून निवड

भाग्यश्री भुवड

मुंबई : भारत बायोटेकनिर्मित "कोव्हॅक्‍सिन' या स्वदेशी लशीची चाचणी लवकरच सायन येथील पालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात सुरू होणार आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) या चाचणीस मान्यता दिली असून, रुग्णालयातील नैतिक समितीच्या अंतिम मंजुरीची या प्रस्तावासाठी प्रतीक्षा आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 18 ते 60 वर्षे वयोगटातील एक हजार सहभागींसह ही तिसरी वैद्यकीय चाचणी होईल.

भारत बायोटेकच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, ही लस बीएसएल- 3 (बायो-सेफ्टी लेव्हल) उच्च सामग्री सुविधेनुसार विकसित करण्यात आली आहे. जुलैपासून संपूर्ण देशभर सुरू झालेल्या टप्प्यातील प्रथम आणि द्वितीय मानवी वैद्यकीय चाचण्यांसाठी भारताच्या औषध नियंत्रकांची (डीसीजीआय) लसीसाठी मंजुरी मिळाली आहे. सायन रुग्णालयाचे फुप्फुसीय औषध विभागाचे प्रमुख डॉ. एन. टी. आव्हाड यांनी सांगितले की, कोरोनासाठी अनेक लसी चाचणीच्या आधारावर वापरल्या जात आहेत. भारत बायोटेकने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) व राष्ट्रीय विषाणुशास्त्र संस्थेच्या (एनआयव्ही) सहकार्याने तयार केलेल्या स्वदेशी लसीच्या चाचणीसाठी सायन रुग्णालयाची निवड केली आहे. दरम्यान, केईएम आणि नायर रुग्णालयांनी आता ऑक्‍सफोर्ड कोव्हिड -19 लशीचा दुसरा डोस स्वयंसेवकांना देण्यास सुरुवात केली आहे. ऑक्‍सफोर्ड कोव्हिड 19 लस तयार करण्यासाठी ऍस्ट्रॅजेनेकाबरोबर भागीदारी करणारी पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियादेखील मानवी वैद्यकीय चाचण्यांचे टप्प्याटप्प्याने आयोजन करत आहे. 

कोवॅक्‍सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यांसाठी निवड झाली. सध्या कागदपत्राची पूर्तता करत आहोत, नैतिक समितीच्या मान्यतेची वाट पाहत आहोत. एक हजार स्वयंसेवकांची निवड करण्यात येईल. त्यातील 20 टक्के लोकांना सहव्याधी असतील. पाच टक्के लोक वैद्यकीय कोव्हिडयोद्धा असतील. ही चाचणी दोन टप्प्यात पुढे जाईल. दुसरा डोस पहिल्या 28 दिवसांनंतर दिला जाईल. 
- डॉ. एन. टी. आव्हाड, प्रमुख, फुप्फुसीय औषध विभाग, सायन रुग्णालय. 

सायन रुग्णालयात लवकरच ही वैद्यकीय चाचणी सुरू होणार आहे. भारत बायोटेक या स्वदेशी कंपनीची ही लस असून, लवकरच वैद्यकीय चाचणी केली जाईल. 
- डॉ. मोहन जोशी, अधिष्ठाता, सायन रुग्णालय 

----------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातून वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT