Firecrackers sakal
मुंबई

मुंबई : गोवंडीत बेकायदा फटाके बनवताना स्फोट

स्फोटामध्ये आई आणि मुलगा जखमी

रशिद इनामदार

मानखुर्द : गोवंडीतील गौतम नगर येथील म्हाडा वसाहतीमध्ये बेकायदा फटाके बनवले जात होते.ते बनवत असताना गुरुवारी(ता.१७) सायंकाळी स्फोट झाला.त्यामध्ये गंगुबाई बैदे (७० वर्षे) व त्यांचा मुलगा योगेंद्र (५० वर्षे) जखमी झाले.त्यांच्यावर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.देवनार पोलिसांनी दोघा मायलेकाविरोधात विविध कलमानुसार गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली असल्याचे वरिष्ठ निरीक्षक रवी अडाणे यांनी सांगितले.

गौतम नगरातील पंचशील सोसायटीमध्ये राहणारे बैदे कुटुंबीय मागील काही वर्षांपासून बेकायदेशीररीत्या फटक्यातील आपटी बॉम्ब बनवत होते.गुरुवारी सायंकाळी असाच स्फोटक पदार्थांपासून गंगुबाई आपटी बॉम्ब बनवत असताना स्फोट झाला.त्यामुळे त्यांच्या दोन्ही हातांना गंभीर इजा झाली तर टी वी पाहत बसलेला त्यांचा मुलगा योगेंद्र हादेखील जखमी झाला.त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अग्निशमन दलाने तत्काळ त्याठिकाणी धाव घेत पाहणी केली व पालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलावून फटाके बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची पोती जप्त केली.पहाटेच्या वेळी गंगुबाई चे कुटुंबीय उरलेले साहित्य घराबाहेर काढत असताना पुन्हा स्फोट झाला मात्र त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.देवनार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपसाला सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT