मुंबई

मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात भीषण अपघात, बस कोसळली 50 फूट खोल दरीत 

देवेंद्र दरेकर

पोलादपूर - मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात आज भीषण अपघात झालाय. आज ज्या भागात अपघात झालाय त्या ठिकाणी सातत्याने अपघात होण्याचं प्रमाण अधिक आहे. अशात आज पुन्हा पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत कशेडी घाटात भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका बालकाचा मृत्यू झाला आहे तर 15 जण जखमी झाले आहेत.

सदर बस मुंबईतील सायनवरून कणकवलीला जात असताना पोलादपूर तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीत कशेडी घाटात आणि भोगाव गावच्या नजीक आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बस दरीत कोसळली असून भीषण अपघात झाला. ही बस 28 प्रवाशांना घेऊन सायन वरून कणकवलीला जात होती, ज्यामध्ये बहुतेक प्रवासी संगमेश्वर येथून असून या अपघातात एका बालकाचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 15 ते 18 प्रवासी जखमी झाले असल्याचे समजते. तब्बल पन्नास फूट खोल दरीत ही बस कोसळून हा अपघात झालाय.

दरम्यान बचावकार्य करून जखमींना पोलादपूर महाडमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे. जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानचे मोफत रुग्णवाहिका तसेच महाराष्ट्र शासनाने 108 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होऊन मदतीसाठी धावले. सदर ठिकाणी महाडमधील साळुंके रेस्क्यू टीमचे सदस्य यांनी तातडीने हजेरी लावून पोलादपूर पोलिस स्टेशन आणि स्थानिकांच्या सहाय्याने यावेळी बचावकार्य केले. 

( संपादन - सुमित बागुल )

dangerous accident in kashedi ghat bus collapsed in 50 feet deep valley

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT