Uddhav Thackeray  Sakal
मुंबई

Shivsena : दसरा मेळाव्याचा प्लॅन बी; उद्धव ठाकरे बाळासाहेबांची आयडिया वापरणार?

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा शिंदे गटाचा की शिवसेनाचा यावर अद्यापपर्यंत कोणताही निर्णय मुंबई महापालिकेने दिलेले नाही.

सकाळ डिजिटल टीम

Dasara Melava Controversy : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा शिंदे गटाचा की शिवसेनाचा यावर अद्यापपर्यंत कोणताही निर्णय मुंबई महापालिकेने दिलेले नाही. त्यामुळे हे मैदान कुणाला मिळणार याचा पेच कायम आहे. तर, दुसरीकडे दोन्ही पक्षांकडून पर्यायी जागांचादेखील शोध घेतला जात आहे. दोन्ही गटांकडून बीकेसी मैदानावर मेळावा घेता यावा यासाठीदेखीळ अर्ज करण्यात आले आहे. या सर्वांमध्ये कोठेच परवानगी न मिळाल्यास उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंची आयडिया वापरून यंदाचा दसरा मेळावा गाजवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

म्हणून मुंबई पालिका शिवाजी पार्क राखीव ठेवू शकते

बंडखोरीनंतर एकनाथ शिंदेंनी खरी शिवसेना त्यांचीच असल्याचा दावा केला आहे. सध्या हा वाद सुप्रीम कोर्टात असून, यावर निर्णय येणे प्रलंबित आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिका शिवाजी पार्क राखीव ठेवू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, दुसरीकडे निर्णय काहीही आला तरी शिवसैनिकांना शिवाजी पार्कवर एकत्र जमा असे आदेश खुद्द उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. त्यामुळे जरी शिवाजी पार्क शिवसेनेला मिळाले नाही तरी, शिवसैनिक मोठ्या संख्येने या परिसरात जमा होऊ शकतात.

बाळासाहेबांची आयडिया काय?

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रत्येक सभा गाजलेल्या आहेत. हे आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या पहिल्या दसरा मेळाव्यावेळी टॅक्सीवर उभं राहून भाषण केले होते असे सांगितले जाते. त्यामुळे जर शिवाजी पार्कवर कोणताही ठोस निर्णय न झाल्यास उद्धव ठाकरेदेखील अशाच पद्धतीने भाषण करू शकतात, अशी शक्यता आहे.

तर, न्यायालयाची पायरी चढणार

'साम टीव्ही'च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी पार्कचा हा गोंधळ आणखी वाढला तर शिवसेना शिवाजी पार्कसाठी थेट न्यायालयाची पायरी चढणार आहे. त्यामुळे आता दसरा मेळावा थेट कोर्टात जाणार असल्याची चर्चा आहे. आपण फक्त आणि फक्त शिवतीर्थावरच घेणार अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे. आता महापालिकेने जर शिवसेनेला शिवाजी पार्क मैदान नाकारलं तर मात्र शिवसेना थेट कोर्टात जाणार आहे. महापालिकेने जर प्रकरण ताणलं तर थेट मैदानात जाऊन मेळावा घेण्याची तयारीही शिवसेनेने दाखवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Sangli Crime : सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; गोकुळनगरात थरार

Mangalwedha News : भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदी सुदर्शन यादव यांची निवड

Navi Mumbai : नवी मुंबईच्या वाशी मनपा रुग्णालयातील घटना; प्रसूतीदरम्यान नवजात बाळ मृत आढळल्याने नातेवाईकांचा संताप

SCROLL FOR NEXT