murder murder
मुंबई

धारावीत सुनेने केली सासूची गळा आवळून हत्या

अथोनी यांना हृदयात वाॅलचा त्रास असल्याने उपचारासाठी डॉक्टरांनी तीन लाखांचा खर्च सांगितला होता

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : धारावीत (dharavi) सुनेने सासूची हत्या (murder) केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी समोर आली. या प्रकरणी नवऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून पत्नी विरोधात गुन्हा दाखल केला आला आहे. तसेच अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, अथोनी मुथुस्वामी (वय ६१) असे हत्या झालेल्या वृद्धेचे नाव आहे. अथोनी यांच्या हत्येप्रकरणी सून शांती मुरगन (वय ३७) हिला पोलिसांनी अटक केली आहे. अथोनी मुथुस्वामी यांना हृदयात वाॅलचा त्रास असल्याने उपचारासाठी डॉक्टरांनी तीन लाखांचा खर्च सांगितला होता. या कारणावरून सून शांतीने अथोनी यांना मारहाण केली.

उपचारासाठी इतका पैसा कुठून आणायचा असे म्हणत भांडण केले. याच रागात सुनेने सासूचा गळा आवळून हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी धारावी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT