Lokshahi News Channel  sakal
मुंबई

Lokshahi News Channel : लोकशाही वृत्त वाहिनीच्या प्रसारणाच्या बंदीला दिल्ली उच्च न्यायालयाकडून स्थगिती...

लोकशाही वृत्त वाहिनीच्या प्रसारणाला शासनाने घातलेल्या 72 तासाची बंदीला दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लोकशाही वृत्त वाहिनीच्या प्रसारणाला शासनाने घातलेल्या 72 तासाची बंदीला दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शनिवारी दिल्ली उच्च न्यायालयात लोकशाही वाहिनीतर्फे दाखल याचिकेवर सुनावणी करताना शासन निर्णयाला स्थगिती दिली आहे.

किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी कारवाई करत केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण खात्याने लोकशाही वृत्त वाहिनीच्या प्रसारणावर 72 तास बंदी आणली होती. न्यायालयाच्या या निर्णयामुळे लोकशाही न्यूज चॅनेलचे प्रक्षेपण आज (ता.23 ) संध्याकाळी 7 वाजतापासून पुन्हा सुरु झाले आहे.

भाजप नेते किरिट सौमय्या यांचा वादग्रस्त व्हिडीओ प्रक्षेपित केल्याप्रकरण लोकशाही या मराठी वृत्तवाहीनीचे प्रक्षेपण ७२ तासाकरीता थांबवण्याचे आदेश केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शुक्रवारी दिले होते.

या निर्णयाला लोकशाही वृत्त वाहिनीने दिल्ली हायकोर्टात आव्हान दिले होते.शनिवारी दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत किरीट सोमय्या यांची कथित व्हिडीओ क्लिप अश्लील नसून शासनाचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद लोकशाही वृत्त वाहिनीच्या वकिलांनी केला. दिल्ली उच्च न्यायलयाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून पुढच्या आदेशापर्यंत प्रक्षेपण शनिवार 7 वाजतापासून प्रक्षेपण सुरु करण्याचे आदेश दिले.

घटनाक्रम

सोमय्या यांचा व्हिडीओ वाहिनीवर प्रसिद्ध केल्याबद्दल लोकशाही चॅनलवर कारवाई करण्यात आली आहे. याबाबतची माहिती खुद्द लोकशाही वाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांनी सोशल मीडियावर दिली होती.लोकशाही चॅनलवर सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसिद्ध कऱण्यात आला होता.

सोमय्या महिलेशी फोनवर व्हिडीओ चॅट करत असल्याचे आरोपही त्यावेळी करण्यात आले होते.दरम्यान या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच वृत्त वाहिनीच्या प्रसरणाच्या बंदीचा निर्णय देण्यात आला.या महिन्याच्या सुरुवातीला, मुंबई पोलिसांनी व्हिडिओच्या कथित प्रसारणासाठी सुतार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

राज्य विधिमंडळाच्या नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांवरील लैंगिक छळाच्या घटनांबाबत विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेल्या चिंतेला उत्तर म्हणून या व्हिडिओबाबत चौकशी सुरू केली. या प्रकरणाचा तपास अजूनही गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT