Uddhav Thackeray Devendra Fadnavis Sakal Digital
मुंबई

August Kranti Maidan:'..तरी काहींच्या पोटात दुखतंय'; आझाद मैदानातून फडणवीसांची टीका

Devendra Fadnavis : फडणवीस आझाद क्रांती मैदानातून बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

सकाळ डिजिटल टीम

Mumbai News - मुंबईत सुशोभीकरणाचे कामे सुरु आहेत. चांगले काम केलं जात आहे. तरी काहींच्या पोटात दुखतंय. ते दररोज एक पत्र लिहितात. त्यांनी गेल्या २५ वर्षात ही पत्र लिहिली असती तर मुंबईची ही अवस्था झाली नसती, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. फडणवीस आझाद क्रांती मैदानातून बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानातून फडणवीस म्हणाले की, 'महात्मा गांधी यांनी चले जावचा नारा देताना करो या मरो हा नारा देखील दिला होता. ते होते म्हणून आपण आहोत आणि त्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळाले. इंग्रजांची एकही खूण आपल्याला नको. सर्व स्वातंत्र्यसैनिकांना माझे नमन आहे. गुलामीच्या खुणा आपल्याला पुसून टाकायच्या आहेत. चले जाव चळवळीला आज 81 वर्ष पूर्ण झालीयेत.'

जाती, धर्म, पंथ, भाषा, लिंग, या आधारावर कोणताही भेद होणार नाही. याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. ॲागस्ट क्रांती मैदानाचा चेहरामोहरा बदलला म्हणून पालिका आयुक्तांचे मी अभिनंदन करतो. मुख्यमंत्र्यांच्या काळात मुंबईत अनेक कामं होत आहेत. पण चांगली काम होत असताना काही लोक टीका करतात. टीका करण्याऐवजी तुम्ही मागच्या २५ वर्षात स्वतःला पत्र लिहायला हवं होत, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.(Latest Marathi News)

फडणवीस यांनी यावेळी पालिका आयुक्त चहल यांचे कौतुक केले. चहल चांगले काम करत आहेत. टीका होत राहतील, पण तुम्ही पारदर्शक काम करत रहा. निंदकाचे घर असावे शेजारी, असं म्हणतात ते खरंच आहे. तुम्ही आपलं काम करत रहा. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त होतील, असा विश्वास फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT