Devendra Fadnavis Support Raj Thackeray e sakal
मुंबई

Fadnavis Meets Thackeray: फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला 'शीवतीर्थ'वर; अचानक भेट दिल्यानं चर्चांना उधाण

गेल्या काही दिवसांत राज ठाकरे यांनी भाजपनं घेतलेल्या काही भूमिकांवर टीका केली होती.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या शीवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. अचानक रात्री उशीरा ही भेट होत असल्यानं अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

गेल्या काही दिवसांत राज ठाकरे यांनी भाजपनं घेतलेल्या काही भूमिकांवर टीका केली होती. त्यामुळं या दोघांमध्ये नेमकी कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होते याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. (Devendra Fadnavis meets Raj Thackeray at his house Shivatirtha sparks discussions for sudden visit)

आगामी मुंबई महानगरपलिकेची निवडणूक तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी मनसे आणि भाजप-शिवसेना युती होणार असल्याच्या चर्चा होत्या. पण गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता, राज ठाकरेंनी भाजपच्या काही भूमिकांना विरोध दर्शवला आहे. यापार्श्वभूमीवर फडणवीस राज ठाकरे यांच्यातील भेटीला महत्व आहे.

गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेनं २००० रुपयांची नोट चलनातू मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर राज ठाकरे यांनी या निर्णयावरुन मोदी सरकारला निशाणा बनवलं होतं. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिर वादावर भाष्य करताना भाजपच्या भूमिकेला विरोध करताना वर्षानुवर्षे जी परंपरा सुरु आहे ती थांबविण्यात काही अर्थ नाही, असं त्यांनी म्हटलं होतं.

नुकत्याच झालेल्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावरुन झालेल्या वादावरही राज ठाकरेंनी भाष्य करताना ह्या सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली, ती लागली नसती तर बरं झालं असतं असं त्यांनी म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT