Mumbai High Court Sakal media
मुंबई

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनची हायकोर्टात याचिका

सुनिता महामुनकर

मुंबई : येस बँक गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि. (DHFL) वतीने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai high court) याचिका (petition) करण्यात आली आहे. सीबीआयने (CBI) दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी याचिकेत केली आहे.

सीबीआयने डीएचएफएलसह प्रवर्तक धीरज वाधवान आणि कपील वाधवान आणि बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. तसेच कंपनीच्या दिवाळखोरीबाबत राष्ट्रीय कंपनी विधी लवादाकडे तक्रार केली आहे. ही कारवाई रोखण्यासाठी डीएचएफएलने विशेष न्यायालयात अर्ज केला होता. मात्र हा अर्ज नामंजूर करण्यात आला. तसेच न्यायालयाने कंपनीच्या वतीने वाधवान यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याविरोधात कंपनीने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. न्या संदीप शिंदे यांच्या पुढे यावर सुनावणी झाली.

याचिकेला सीबीआयच्या वतीने विरोध करण्यात आला आहे. लवादाच्या आदेशाविरोधात अपिलीय लवादापुढे याचिका करायला हवी, त्यामुळे न्यायालयात सुनावणी होऊ शकत नाही. तसेच लवादाचा आदेश कायदेशीर आहे, असा युक्तिवाद वकील हितेन वेणेगावकर यांनी केला. याचिकेवर पुढील सुनावणी ता. 27 रोजी होणार आहे. दरम्यान, ईडिने देशमुख यांच्या विरोधात केलेल्या याचिकेवर महानगर दंडाधिकारी न्यायालयात ता. 28 रोजी युक्तिवाद होणार आहेत. देशमुख समन्स बजावूनही हजर राहत नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ईडिने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kevin Pietersen: वर्ल्ड कपआधी इंग्लंडचा मास्टरप्लॅन! १२ वर्षांनंतर पीटरसनला दिली संघात एन्ट्री; पण नेमकी भूमिका काय?

Phulambri News : काँग्रेसच्या गांधी भवनात सत्तारांची अचानक ‘एन्ट्री’..! भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

IND vs PAK: भारताविरुद्धच्या सामन्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराला ICC कडून शिक्षा! शफाली वर्माला सेंडऑफ देणं पडलं महागात

अशोक सराफ की निवेदिता सराफ? भांडण झालं तर सगळ्यात आधी सॉरी कोण म्हणतं? अभिनेत्री म्हणाल्या- आम्ही...

Mangalwedha News : धनगर आरक्षणाची अंमलबजावणीसाठी ठोस कारवाई करा; धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

SCROLL FOR NEXT