मुंबई

BMCकडून शिक्षकांच्या बोनसमध्ये भेदभाव; अनुदानित शाळेतील शिक्षकांना 50 टक्के सानुग्रह अनुदान

तेजस वाघमारे

मुंबई : मुंबईतील अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2009 पासून सानुग्रह अनुदान महापालिकेकडून देण्यात येत आहे. परंतू महापालिकेच्या शिक्षक कर्मचाऱ्यांपेक्षा 50 टक्के कमी सानुग्रह अनुदान अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षकांना देण्यात येत आहे. अनुदानामधील भेदभाव दूर करून महापालिकेने 4 हजार 500 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी मुंबई शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघाने केली आहे.

अनुदानित प्राथिमक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संपूर्ण अनुदान मिळावे यासाठी मुंबई शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघाकडून महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. महापालिकेकडून कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन करण्यात येते. परंतू बोनसमध्ये भेदभाव होत असल्याची भावना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आहे. महापालिकेच्या शिक्षकांना संपूर्ण बोनस देण्यात येतो. परंतू अनुदानित शिक्षकांवर अन्याय का असा सवाल शिक्षक करत आहेत. महापालिकेने शिक्षकांना देण्यात येत असलेल्या बोनसमधील भेदभाव दूर करावा, अशी मागणी संघटनेने महापालिकेकडे केली आहे. याबाबत संघटनेने शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A Tri-Series: वैभव सूर्यवंशीकडे लक्ष, भारतीय अ संघ श्रीलंकेत खेळणार वनडे तिरंगी मालिका! जाणून घ्या कधी अन् कुठे पाहाणार सामने?

Online Fertilizer Sales : ऑनलाईन खत विक्रीमुळे शेतकरी मेटाकुटीस; राज्यातून फक्त दोनच जिल्हयांसाठी जाचक अटी

CJP Pune Protest: जंतरमंतर नंतर कॉकरोच जनता पक्ष पुण्यात आंदोलन करणार! कधी आणि कुठे? पार्टीने तारीख आणि ठिकाण सांगितलं

Latest Marathi News Update : राज्यासह देशात काय घडलं? जाणून घ्या...

Sakal Auto Expo 2026 : ‘सकाळ ऑटो एक्स्पो’ १३ व १४ जूनला; वाहनांचे विविध पर्याय एकाच ठिकाणी होणार उपलब्ध

SCROLL FOR NEXT