मुंबई

राज्यातील आशा सेविकांची दिवाळी होणार गोड; मोबदल्यापोटी 57 कोटी वितरीत

भाग्यश्री भुवड

मुंबई : राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना जुलै ते ऑक्‍टोबर 2020 या कालावधीतील वाढीव मोबदला देण्यासाठी 57.56 कोटी रुपये वितरीत केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाने आज शासन निर्णय काढला आहे. 

राजेश टोपे म्हणाले, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत. ग्रामीण आरोग्याच्या ते कणा आहेत. त्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय 25 जून 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना 1 जुलै 2020 पासून प्रत्येकी 2000 आणि 3000 रुपये इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना जुलै ते मार्च या कालावधीतील वाढीव मोबदला अदा करण्यास पावसाळी अधिवेशनात विधिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यास अनुसरून वित्त व नियोजन विभागाने जुलै ते ऑक्‍टोबर या कालावधीचे 57.76 कोटींच्या अनुदान वितरणास मान्यता दिली. दिवाळीपूर्वी राज्यातील सुमारे 70 हजार आशांना वाढीव मोबदल्याचा लाभ मिळणार असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT