Attack Sakal
मुंबई

Dombivali Crime : धाकट्या भावाची तक्रार केल्याने थोरल्याने केले कोयत्याने वार; घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

धाकट्या भावाची तक्रार केल्याने थोरल्याने थेट एका तरुणावर कोयत्याने वार करत त्याला गंभीर जखमी केल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - धाकट्या भावाची तक्रार केल्याने थोरल्याने थेट एका तरुणावर कोयत्याने वार करत त्याला गंभीर जखमी केल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून, याप्रकरणी चार जनांविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश चव्हाण, साहिल मोरे, तुषार वाल्मिकी आणि राहुल गौड अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. जखमी तरुणावर मुंबईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी परिसरात आनंद सिंह तोमर (वय-26) हा रिक्षाचालक रहातो. याचं परिसरात आकाश चव्हाण सुद्धा राहतो. आकाश याचा लहान भाऊ आनंदच्या आईशी सारखा भांडण करायचा. यामुळे आनंद आपला मित्र राम कनोजिया सोबत आकाशकडे गेला.

आनंदने आकाशकडे त्याच्या भावाबाबत तक्रार केली. मात्र या तक्रारीचा आकाशला राग आला. आकाशने आनंद आणि राम यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरवात केली. दरम्यान आकाशचा मित्र साहिल मोरे याने राम कनोजिया याच्या डाव्या हातावर कोयत्याने वार केला.

मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्या आनंदवरही साहिलने वार केला. यानंतरही आरोपीने दोघांना धमकी दिली. आनंद आणि रामने कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. आनंद याच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. या हल्ल्यात राम याच्या हातावर आणि मानेवर गंभीर जखमा झाल्याने त्याला मुंबईच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हल्ल्याची थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

दरम्यान कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत गंभीर गुन्हे घडत आहेत, तरीही पोलिसांचा वचक आणि भीती गुन्हेगारांना नसल्याचे दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT