Crime esakal
मुंबई

Dombivali Crime : कौटुंबिक वादातून एका तरुणाचे ब्लेडने गुप्तांग छाटले

कल्याण पूर्वेतील गोळवली परिसरात कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणातून एक धक्कादायक घटना घडली आहे.

शर्मिला वाळुंज

कल्याण पूर्वेतील गोळवली परिसरात कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणातून एक धक्कादायक घटना घडली आहे.

डोंबिवली - कल्याण पूर्वेतील गोळवली परिसरात कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणातून एक धक्कादायक घटना घडली आहे. तिघांनी मिळून एका तरुणाचे धारदार ब्लेडने गुप्तांग छाटत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात सोनुकुमार राम (वय 32), करण राम (वय 28) आणि सुरेंद्रकुमार राम (वय 35) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी संजयकुमार राम (वय 39) याच्यावर मुंबईतील जे.जे.रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिघाही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.

डोंबिवली एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत काम करणारे हे चौघे ही कामगार गोळवली येथील शंकर शेठ चाळीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून राहण्यास होते. सोनुकुमार व संजयकुमार यांच्या कौटुंबिक वाद होते. या वादातून संजय कुमार याचा काटा काढण्याचा विचार सोनू कुमार याच्या डोक्यात होता. मंगळवारी रात्री त्यांनी घरी मेजवानीचा बेत आखला. या दरम्यान सर्वांनी एकत्रित जेवण करत नंतर मद्यपान केले. 12 वाजेपर्यत मद्यपान केल्यानंतर सोनू कुमार व सुरेंद्र कुमार यांच्यात वाद झाला. या वादाचे रुपांतर पुढे हाणामारीत झाले.

सोनु, करण व सुरेंद्र कुमार या तिघांनी संजयकुमार ला मारहाण केली. त्यानंतर सोनू कुमार ने धारदार ब्लेडने संजय कुमार याचे गुप्तांग कापले. संजय कुमार याच्या शरीरातून खूप रक्तस्त्राव झाल्याने आरोपींनी त्याला शिवम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी मुंबई तील जे. जे. रुग्णालयात दाखल केले. संजयकुमार याच्या तक्रारीवरुन मानपाडा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले आहे. याचा अधिक तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT