मुंबई

बहिणींनो काळजी करू नका; रक्षाबंधनसाठी रविवारीही पोस्टाची सेवा सुरू ...

शर्मिला वाळुंज


ठाणे :  लॉकडाऊनमुळे अनेक बहिणींना यंदा माहेरी जाऊन भावाला राखी बांधता येणार नाही. त्यामुळे त्यांनी राखी पाठवण्यासाठी टपालाला पसंती दिली आहे. त्याची दखल घेत या विभागाने वेळेवर राखी पोहचवण्यासाठी रविवारी (ता.2) सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

भाऊ दूर रहाण्यास असल्याने किंवा अन्य कारणाने बहिणींना रक्षाबंधनच्या दिवशी भावाकडे जाणे शक्य होत नाही. त्यामुळे बहिणी कुरिअरने किंवा टपालमार्फत राखी पाठवितात. यंदा कुरिअर सेवा बंद असल्याने टपाल विभागाच्या मदतीने राखी पाठविण्याचा पर्याय अनेकांनी स्वीकारला. मात्र, 
शनिवारी बकरी ईदची सुट्टी व सोमवारी रक्षाबंधन आहे. त्यामुळे राखी वेळेवर पोहचवण्यासाठी रविवारीही टपाल कार्यालय कार्यरत राहणार आहे, अशी माहिती ठाणे टपाल विभागाच्या वतीने देण्यात आली.

विशेष राखी पाकिटाला पसंती
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही टपाल विभागाने रक्षाबंधन निमित्त विशेष राखी पाकीट  उपलब्ध केले होते. या योजनेला यंदा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ठाणे विभागातील सर्व टपाल कार्यालयात राखी पाकीटाचे बुकींग करण्यासाठी काऊंटर उघडण्यात आले होते. राखी पाकीट तातडीने वेगळी करुन ते पत्त्यावर पोहोच करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

---------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vajreshwari Kund : वज्रेश्वरीतील गरम पाण्याचे झरे धोक्यात! शंकर मंदिरासमोरील पवित्र कुंड पूर्णपणे कोरडे; भाविकांमध्ये तीव्र नाराजी, गेल्या 3 वर्षांपासून नेमकं काय घडतंय?

Gangapur farmers: गंगापूर तालुक्यात मान्सून रखडल्याने शेतकरी चिंताग्रस्त; मृग नक्षत्रात पावसाची प्रतीक्षा, 15 जूननंतर पेरणीचा सल्ला

Latest Marathi News Live Update : महाड मनसे आक्रमक, स्थानिकांना रोजगार, मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर अधिकाऱ्यांना धरले धारेवर

MPSC Success Story भावाने उचलली शिक्षणाची जबाबदारी; बहिणीची जिद्दीच्या जोरावर MPSC मध्ये भरारी, पूजा घोडके यांचा प्रेरणादायी प्रवास..

वर्ल्डकपआधीच फूटबॉलविश्व हादरलं! मुंबईत नामांकित प्रशिक्षकाकडून महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार; व्हिडिओ बनवून ३ वर्षे ब्लॅकमेल

SCROLL FOR NEXT