मुंबई

ढोल ताशांचा गजर आणि गुलालाची मुक्त उधळण थांबली; पथकांना लाखोंचा फटका

प्रसाद जोशी


वसई - गणेशेत्सवात ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण यंदा कोरोनामुळे दिसली नाही. अत्यंत साध्या पद्धतीने गणेशाचे आगमन आणि विसर्जन होणार आहे. मात्र यामुळे ढोलताशा पथकाला सार्वजनिक मंडळांकडून मिळणारे लाखो रुपयांवर पाणी सोडावे लागले आहे.परंतु कोरोना प्रादुर्भाव असताना शासनाने घेतलेल्या निर्णयाचे देखील पधकाकडून स्वागत केले जात आहे.

वसईत घरगुती व सार्वजनिक मंडळात आगमन आणि विसर्जनासाठी ढोल ताशा पथक सज्ज होत असते. त्यासाठी दोन महिने आगोदर सराव केला जातो. वाद्यांची दुरुस्ती केली जाते परंतु कोरोना महामारीत परवानगी नाही गुढीपाडव्याच्या दिवशी तसेच गणेशोत्सवात या पथकांना चांगले मानधन मिळते त्यातून थोडे फार पैसे मिळतात परंतु यंदा दोन्ही उत्सवात ढोल ताशा पथकांना काम मिळाले नाही. विशाल ढोल ताशा पथकांचे अध्यक्ष दर्शन म्हात्रे , उपाध्यक्ष दिशा राणे व पथकप्रमुख कुणाल वीरकर यांच्या म्हणण्यानुसार पथकात 70 ते 80 जण आहेत. गणेशोत्सवात वसई तालुक्यातील 15 सार्वजनिक मंडळांनी गेल्या वर्षी बोलावले होते.  यावेळी 4 ते 5 लाख इतके मानधन मिळाले तर गुढीपाडव्याला 3 ठिकाणी जात होतो 50 हजाराहून अधिक पैसे मिळाले होते दहीहंडी उत्सवात देखील बोलावले जाते परंतु यंदा हाती काहीच आले नाही मात्र वाद्यांची दुरुस्ती, सरावासाठी लागणारा खर्च हा करावा लागणार आहे. अशीच परिस्थिती सर्व ढोल ताशा पथक, बँडपथक आदींची झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरवर्षी कला दाखविण्याची संधी,मंडळाकडून कौतुकाची थाप व पैसे देखील मिळत असल्याने उत्साह वाढतो मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन केले  जात आहे.कमाईवर विरजण पडले असले तरी कोरोनाच्या या लढाईत गर्दीतून दूर राहून का होईना आम्ही पाठिंबा देत आहोत याचा आनंद आहे. असे विशाल ढोल ताशा पथकाचे संचालक रोशन घरत व जयेश घरत यांनी 'सकाळ'शी बोलतांना सांगितले.

-----------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT