मुंबई

अरे वाह... ही तर दिलासा देणारी बातमी! मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी गेला 'इतक्या' दिवसांवर

समीर सुर्वे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईतील कोव्हिड रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 61 दिवसांवर पोहोचला असून रुग्णदरवाढ 1.14 टक्क्यांंपर्यंत खाली आली आहे. 22 मार्चरोजी हा कालावधी 3 दिवसांचा होता. एच पुर्व प्रभागातील रुग्ण दुप्पट होण्याचा वेग 152 दिवसांवरुन 126 दिवसांपर्यंत वाढला आहे. 

मुंबईत 22 जूलैपर्यंत 1 लाख 1 हजार रुग्णांची नोँद झाली असून 5 हजार 681 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 74 हजार 210 रुग्णांनी कोव्हिडवर मात केली आहे. जुलै महिन्यातील हॉटस्पॉट असलेल्य़ा उत्तर मुंबईतील संसर्गही आटोक्यात येत आहे. शहरातील एकाही विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 30 दिवसांच्या खाली नाही.

बोरीवलीत 32 दिवसांत दिवसात रुग्ण दुप्पट होत आहेत. हा शहरातील सर्वाात कमी कालावधी आहे. तर, एच पुर्व वांद्रे पुर्व प्रभागात 126 दिवसांत रुग्ण दुप्पट होत आहेत. हा शहरातील सर्वाधिक कालावधी असला तरी गेल्या आठवड्यापर्यंत या प्रभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 150 दिवसांपेक्षा जास्त होता. बोरीवली आणि कांदिवली येथे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 40 दिवसांपेक्षा कमी आहे. कांदिवलीत 38 दिवस त्याखालोखाल डी प्रभाग ग्रॅन्टरोड मलबार हिल 43 दिवस, दहिसर 46 दिवस आणि गोरेगावमध्ये 47 दिवसांत रुग्ण दुप्पट होत आहेत. याशिवाय 4 विभागांत 80 दिवसांच्यावर, 5 विभागात 70 दिवस, 4 विभागात 60 दिवस, तर, 3 विभागांत रुग्णदुपटीचा कालावधी 50 दिवसांहून अधिक नोंदवण्यात आला आहे. 

रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीतील टप्पे (रुग्णवाढीचा दर)

- 22 मार्च  -       3 दिवस 
- 15 एप्रिल   -   5 दिवस 
-  12 मे      -   10 दिवस 
- 2 जून        -  20 दिवस ( 3.64%)
- 16 जून   -     30 दिवस (2.43%)
- 24 जून     -   41 दिवस (1.72%)
- 10  जुलै      -50 दिवस (1.39%)
22    जुलै      -61 दिवस( 1.14%)

--------------------------------------------------------------

Edited by Tushar Sonawane

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revati Sule : लेकीचं लग्न होणार, सुप्रिया सुळेंनी दोघांचा फोटो शेअर करत म्हटलं, सांगायला आनंद होतोय

Best Recharge : तीन एकदम जबरदस्त रिचार्ज प्लॅन; 28 दिवसांपर्यंत फ्री सर्विस, 96GB एक्स्ट्रा डेटासह फ्री टीव्ही चॅनेल्स

Latest Marathi News Live Update : जळगाव जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू

नवाजुद्दीन सिद्दीकीने राजपाल यादवला धोका दिला? मैत्रीत गद्दारी केल्याचा आरोप करत नेटकऱ्यांनी केल ट्रोल

Akola News: आमदार अमोल मिटकरीची विमान अपघातप्रकरणी चौकशीची मागणी; मुख्यमंत्री फडणवीसांचे सकारात्मक आश्वासन!

SCROLL FOR NEXT