Sachin Basare Sakal
मुंबई

शिंदेंचं 'कल्याण', आमदार विश्वनाथ भोईर शिंदेगटात, सचिन बासरेंकडे शिवसेनेची जबाबदारी

राज्यात सत्ता परिवर्तन होऊन ही शिवसेना आणि शिंदे गट मधील वाद काही मिटत नसल्याचे समोर आले आहे.

रविंद्र खरात

राज्यात सत्ता परिवर्तन होऊन ही शिवसेना आणि शिंदे गट मधील वाद काही मिटत नसल्याचे समोर आले आहे.

कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर हे शिंदे गटात सामील झाल्याने आता शिवसेना माजी नगरसेवक सचिन बासरे यांची नियुक्ती जाहीर झाल्याने पुन्हा कल्याण मध्ये राजकीय वातावरण तापले आहे .

राज्यात सत्ता परिवर्तन होऊन ही शिवसेना आणि शिंदे गट मधील वाद काही मिटत नसल्याचे समोर आले आहे. शिंदे गटाला पाठींबा देणाऱ्या कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांना चांगले महागात पडले आहे. शुक्रवारी पत्रकार परिषद घेत विश्वनाथ भोईर यांनी मी शिवसेनेत असून, मी राजीनामा देणे प्रश्न नसून, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हेच असून नेते एकनाथ शिंदे असल्याचे स्पष्ट केले होते. त्याला काही तास होत नाही तोच शिवसेना माजी नगरसेवक सचिन बासरे यांची कल्याण पश्चिम शिवसेना प्रमुखपदी नियुक्ती जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा होती.

सचिन बासरे यांनी रवि कपोते, शरद पाटील, वंडार कारभारी, दिनेश शेटे आदीच्या उपस्थित शहर शाखेत पदभार स्वीकारला. यावेळी शिवसैनिकाला शहरप्रमुख पद दिल्याचा आनंद व्यक्त करत पक्ष सोडून जाण्याचे प्रकार अनेक वेळा झाले असून, कल्याण सहित राज्यातील शिवसैनिक आहे तेथेच असून जेव्हा जेव्हा पक्षावर संकट आले तेव्हा शिवसैनिक काल आज आणि उद्या ही उभा राहणार असून, आम्ही उद्धव जिच्या पाठीशी कायम असून पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवू. असा दावा यावेळी सचिन बासरे यांनी केला. यामुळे भविष्यात कल्याण मध्ये ही शिवसेनेतील शिंदे गट आणि ठाकरे गट मध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT