tejaswini buses sakal media
मुंबई

तेजस्विनी बस आणखी किती दिवस प्रतीक्षेत ठेवायच्या ? पालकमंत्र्यांना सवाल

'दैनिक सकाळ'च्या बातमीची दखल घेत मनसे आमदारांनी पालकमंत्र्यांना ट्विट करीत केला सवाल

शर्मिाला वाळुंज

डोंबिवली : महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी (woman safety journey) कल्याण डोंबिवली महापालिका (KDMC) परिवहन ताफ्यात 4 बस (buses) दाखल झाल्या आहेत. पालकमंत्री यांची वेळ मिळत नसल्याने या बसचा लोकार्पण सोहळा (inauguration) लांबला असल्याचे वृत्त दै. सकाळने (sakal news) गुरुवारी प्रसिद्ध केले. याची दखल मनसे आमदार राजू पाटील (raju patil) यांनी घेत पालकमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) व पालिका प्रशासन यांना ट्विट करीत आणखी किती दिवस बस प्रतिक्षेत ठेवायच्या? असा सवाल केला आहे.

राज्य सरकारने महिला प्रवाशांसाठी तेजस्विनी बसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बस खरेदी निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळत नसल्याने गेले तीन वर्षे ही सुविधा उपलब्ध होऊ शकली नाही. अखेर पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व माजी व्यवस्थापक मिलिंद धाट, सभापती मनोज चौधरी व सदस्यांनी बैठक घेत आयुक्तांनी 2021 मध्ये निविदा प्रक्रिया काढली, त्याला प्रतिसाद मिळाल्याने पुढील सर्व प्रक्रिया आता पार पडल्या आहेत. यामुळे लवकरच तेजस्विनी बस धावणार असे बोलले जात होते. मात्र ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ मिळाली नसल्याने या बसचा उदघाटन सोहळा अजून निश्चित झालेला नाही. याविषयी दै. सकाळने गुरुवारी महिलांना अजुनही तेजस्विनीची प्रतिक्षा या मथळ्याखाली वृत्त प्रसारित केले.

या वृत्ताची दखल मनसे आमदार राजू पाटील यांनी घेतली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रशासन यांना ट्विट करीत त्यांनी सवाल केला आहे. 15 ऑगस्टला चालू होणाऱ्या खास महिलांसाठीच्या तेजस्विनी बस पालकमंत्र्यांना वेळ नाही म्हणून अजून रस्त्यावर नाहीत. 2018 पासून रखडलेल्या या चार बस अजून किती दिवस प्रतिक्षेत ठेवायच्या ? असा सवाल त्यांनी ट्विट करीत केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

Pune Crime : तळलेल्‍या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर; ‘एफडीए’ ची ५ ठिकाणी धाड, १९ लाखाहून अधिक रकमेचा साठा जप्त

Jalana Viral Video: दागिन्यावर डोळा, गावकऱ्यांनी भोंदूबाबाला दिला चांगलाच चोप, काय घडलं?

SCROLL FOR NEXT