Anandrao adsul
Anandrao adsul sakal media
मुंबई

शिवसेना नेते ईडीच्या रडावर; आनंदराव अडसूळ यांना ईडीचा समन्स

सकाळ वृ्त्तसेवा

मुंबई : ईडीच्या (Enforcement Directorate) रडावर अजून एक शिवसेना नेते आले आहे. मनी लॉडरींग प्रकरणी शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ (Abhijit Adsul) यांना ईडीने चौकशीसाठी (investigation) हजर राहण्यासाठी समन्स बजावला. ईडीचे एक पथक आज (ता. 27 सप्टेंबर) अडसूळ यांच्या मुंबईतील कांदिवली इथल्या घरी जाऊन आले. मात्र चौकशीदरम्यान आनंदराव अडसूळ यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बडनेरा मतदासंघाचे आमदार रवी राणा यांनी सिटी कोऑपरेटीव्ह बँकेतील घोटाळ्यासंदर्भात ईडीकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरुन कारवाई झाल्याचे सांगीतले जाते. आनंदराव अडसूळ हे या बँकेचे संचालक असतांना झालेल्या 980 कोटी रुपयाच्या कथित गैरव्यवहाराबद्दल ईडीची चौकशी सुरु आहे. मुंबई पोलिसाच्या आर्थिक गुन्हे शाखेने यापुर्वी बँकेच्या कर्ज वाटप आणि इतर व्यवहारात झालेल्या अनियमतेबाबत गुन्हा दाखल करुन, चौकशी केली होती. याच आधारावर ईडीने अडसूळ यांच्यावर मनी लाँडरीगचा गुन्हा दाखल करुन आनंदराव अडसूळ यांची चौकशी केली होती.

त्यांचा जबाबही नोंदवला होता. 2019 च्या लोकसभा निवडणूकीत अमरावती मतदारसंघातून नवनित राणा यांनी आनंदराव अडसूळ यांना पराभूत केले. खासदार नवनित राणा यांचे जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे सांगत अडसूळ यांनी त्याला मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं होत.बॉम्बे हायकोर्टाने हे प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय दिला. त्यानंतर हे प्रकरण पुढे सर्वोच्च न्यायालयात गेलं, हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयारी होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

Accident News : पुण्यात कल्याणीनगर येथे भीषण अपघात, दोघांना चिरडले,अल्पवयीन कारचालक ताब्यात

Sharmistha Raut : "माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायचे"; घटस्फोटाच्या त्या प्रसंगावर व्यक्त झाली शर्मिष्ठा

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT