Haridas and Vidya Sakal
मुंबई

कोरोनाची भीती, वडिलांचा मृतदेह 3 दिवस घरातच; मुलीचीही आत्महत्या

विरार मध्ये एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. कोरोनाच्या भीतीने 72 वर्षीय व्यक्तीचा 3 दिवस मृतदेह कुटुंबीयांनी घरातच ठेवला होता.

विजय गायकवाड

नालासोपारा - विरारमध्ये (Virar) एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. कोरोनाच्या (Corona) भीतीने 72 वर्षीय व्यक्तीचा 3 दिवस मृतदेह कुटुंबीयांनी घरातच ठेवला होता. तर 40 वर्षीय मुलीनेही विरार नवबपूर समुद्रात जाऊन आत्महत्या (Suicide) केली होती. बुधवारी सकाळी तिच्या दुसरी बहीण ही अर्नाळा समुद्रात जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असताना स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे तिला वाचविण्यात आले आहे. वाचलेल्या तरुणीच्या जवाबावरून हा सर्व धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ही सर्व घटना कोरोनाची भीती, आर्थिक विवंचना, आणि कौटुंबिक वादातून घडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. (Mumbai Latest News)

विरार पश्चिम ग्लोबल सिटी परिसरातील अग्रवाल ब्रूक्लीन पार्क या इमारतीत आई- वडील आणि दोन मुली असे 4 जणांचे कुटुंब राहत होते. मयत हरिदास साहकार (वय 72) , 65 वर्षांची आई, विद्या हरिदास साहकार (वय 40), स्वप्नल हरिदास साहकार (वय 36) असे कुटुंबात राहणाऱ्या व्यक्तींची नाव आहेत. वडील हरिदास हे रेशनिग डिपार्टमेंट मधून निवृत्त झाले होते. निवृत्तीच्या पेन्शन वर यांचे सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. मागच्या 8 दिवसापूर्वीच विरार पश्चिम ग्लोबल सिटी मधील ब्रूक्लीन पार्क या इमारतीच्या दुस-या मजल्यावर भाड्याने राहण्यासाठी आले असल्याची माहिती स्थानिक रहिवाशी प्रमोद सामंत आणि इस्टेट एजंट हरिकेशन मिश्रा यांनी दिली आहे.

1 ऑगस्ट रोजी वडील हरिदास यांचे राहत्या घरात अचानक निधन झाले होते. या निधनानंतर वडिलांना कोरोना झाला असावा आणि हे जर आपण बाहेर कुणाला सांगितले तर आपणालाही कोरन टाईन करतील या भीतीने 1 ऑगस्ट पासून वडिलांचा मृतदेह राहत्या घरातील बेडवरच ठेवण्यात आला होता. इमारती मधील राहिवाशाना याचा वास येत होता. रहिवाशांनी सेक्युरिटी सभासदांना सांगितले होते. परंतु हा वास कुटून येतोय हे कळत नव्हते. पण आज पोलिसांनी दुसऱ्या मजल्यावर जाऊन सर्व तपासणी केली असता हा सर्व प्रकार उघड झाला आहे. घटनास्थळावर मृतदेहाचा वास येऊ नये म्हणून मृतदेहाच्या शेजारी, डाम्बर गोळी, कापूर, अगरबत्ती लावून सर्व कुटुंब हे घरातच मृतदेहा शेजारी राहत असल्याचेही समोर आले आहे.

मंगळवारी याच कुटुंबातील 40 वर्षाच्या विद्या साहकार या तरुणीचा मृतदेह हा विरारच्या नवबापूर समुद्र किनाऱ्यावर सापडला होता. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला असता बुधवारी सकाळी दुसरी मुलगी स्वप्नल हीही आत्महत्या करण्यासाठी अर्नाळा समुद्र किनार्यावर आली होती. तिला पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी वाचविले आहे. वाचलेल्या मुलीच्या जवाबावरून कळले की मंगळवारी सापडलेला मृतदेह हा तिच्या बहिणीचा होता तर वडिलांचे निधन राहत्या घरात झाले आहे. 65 वर्षांची आई सोबत आहे. त्यावरून आम्ही घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. याचा अधिक तपास करीत आहोत असे अर्नाळा चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

तो आला आणि माझं आयुष्यच बदललं! रिंकू राजगुरूने दिली प्रेमाची कबुली; शेअर केला तिच्या रोमिओचा फोटो

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

SCROLL FOR NEXT