Financial consultant appointed for Thane-Borivali underground road MMRDA mumbai sakal
मुंबई

MMRDA : ठाणे-बोरिवली भूमिगत मार्गासाठी आर्थिक सल्लागार नेमणार...

ठाणे-बोरिवली दरम्यान ११.८ किमीच्या भमिगत मार्गाची बांधणी करण्यात येणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ठाणे-बोरिवली भूमिगत मार्गाच्या बांधणीसाठी सुधारित आराखड्यानुसार १६ हजार ६०० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. हा निधी उभारत असताना कर्ज उभारणीसाठी आता एमआरडीएने आर्थिक सल्लागार नेमण्याची तयारी केली आहे. लवकरच आर्थिक सल्लागाराच्या नेमणुकीसाठी निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएने दिली आहे.

ठाणे-बोरिवली दरम्यान ११.८ किमीच्या भमिगत मार्गाची बांधणी करण्यात येणार आहे. या मार्गाच्या बांधणीसाठी एमएमआरडीएने मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नियुक्ती केली आहे. सुधारित आराखड्यानुसार या मार्गीकेच्या ११.८ कि.मी. लांबीपैकी ४.४३ कि.मी. लांबी ही ठाणे जिल्ह्यातुन व ७.४ कि.मी लांबी ही बोरीवली जिल्ह्यातुन प्रस्तावित आहे.

तर बोगद्या कडे जाण्यासाठी ठाण्याच्या दिशेने घोडबंदर येथे उड्डाण पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. प्रकल्पाचा अंदाजित बांधकाम खर्च रॉयल्टी वगळून भूसंपादनासह १६ हजार ६०० कोटी इतका आहे. या प्रकल्पाचे बांधकाम एकुण ३ पॅकेजसमध्ये करण्याचे प्रस्तावित आहे. त्यापैकी स्थापत्य कामाचे २ पॅकेजेस व तिसरा भाग सुनियोजित वाहतुक प्रणाली या कामाचे पॅकेज आहे.

यामध्ये पॅकेज १ (बोरिवली बाजू) साठी येणार खर्च ७२७३ कोटी, पॅकेज २ (ठाणे बाजू) साठी येणारा अंदाजित खर्च ७४६१ कोटी आणि पॅकेज ३मध्ये सिस्टमची खरेदी, स्थापना आणि कार्यान्वित करण्यासाठी येणार अंदाजित खर्च ५३० कोटी इतका आहे.

सुधारित आराखड्यात बोगद्यातील अत्याधुनिक यंत्रणा,ओपन रोड टोलिंग यंत्रणा आणि भुयारी मार्गात प्रत्येकी ३०० मीटर अंतरावर पादचारी क्रॉसिंग पॅकेज उभारण्यात येणार आहे, यामुळे प्रकल्प खर्चात वाढ झाली आहे.

प्रकल्प उभारणीसाठी येणार खर्च आणि त्यासाठी लागणार निधी उभारणीसाठी आर्थिक सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे. कर्ज उभारणी झाल्यांनतर कर्जाची परतफेड आणि इतर आर्थिक बाबींच्या निश्चितीसाठी आर्थिक सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे. सल्लागार नियुक्तीसाठी एमएमआरडीएने निविदा जारी केली असून लवकरच आर्थिक सल्लागाराची नेमणूकही करण्यात येईल, अशी माहिती एमएमआरडीएने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT