लैंगिक आत्याचार
लैंगिक आत्याचार sakal
मुंबई

मुंबई : ५ अल्पवयीन मुलींवर बलात्कार; 'बुड्ढा अंकल' वर गुन्हा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : डोंगरी येथील बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलींवर एका ५० वर्षीय व्यक्तीने गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. त्याप्रकरणी १७ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

साम टीव्हीच्या वृत्तानुसार ही घटना मुंबईतील चेंबूर येथे घडली असून डोंगरी येथील आशा सदन येथे समुपदेशन सुरू असताना पीडितेने तीच्या तीन लहान बहिणी (११ वर्ष, १३ वर्ष व १५ वर्ष वयाच्या) व एका मैत्रीणीवर आरोपी फिरोज शेख ऊर्फ बुढा अंकल याने बलात्कार केल्याची माहिती दिली होती. पीडितेच्या म्हणण्यानुसार आरोपीने पाच मुलींना गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर लैंगिक आत्याचार केला. त्यानंतर या घटनेचं चित्रिकरण करुन आरोपीने त्याच्या मित्राला पाठवले आणि त्यांच्याकडून पैसे घेतले.

या पैशातील काही रक्कम आरोपीने पीडित मुलींनाही दिली होती. या घटनेनंतर त्या मुलींना या आरोपीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडलं. हा आत्याचार चेंबूर परिसरात २०१८ ते २०२१ दरम्यान झाल्याचं पीडितेने सांगितलं. दरम्यान चेंबूर येथील कुंठनखान्यातून पीडित १७ वर्षीय मुलीची २०१९ मध्ये सुटका करण्यात आली होती. परंतु आरोपीचे आत्याचार चालूच होते.

दरम्यान डोंगरी येथील आशा सदन येथे समुपदेशन सुरू असताना समुपदेशन करणाऱ्या महिलांना १७ वर्षीय पीडित मुलीने ही घटना सांगितली. त्यानुसार चेंबूर येथील आर.सी.एफ. पोलिसांनी सदर ५० वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करुन याप्रकरणी शेख विरोधात ३७६(२) (आय), ३७६ (२) (अ), ३७६ (२) (ब), ३७६(२)(ई), भादंवि सह ४,६,८,१२ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्या सह ३,४,५ अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यासह, ६६(ई) व ६७ माहीती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS Live Score : हैदराबादला तिसरा धक्का! अर्धशतक करणाऱ्या अभिषेक शर्माला शशांक सिंगने धाडलं माघारी

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

SCROLL FOR NEXT