मुंबई

नियम पाळा नाहितर; तुरुंगात जाल! घरगुती गणेशोत्सवासाठी BMC ची कडक नियमावली

समीर सुर्वे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोव्हिडच्या पार्श्वभुमीवर मुंबईत घरगुती गणपती मुर्ती दोन फुटापर्यंत आणि शक्यतो शाडूची असावी. घरीच किंवा कृत्रिम तलावात विसर्जन करावे. शक्यतो विसर्जन माघ महिन्यात किंवा पुढल्या वर्षी करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. घर प्रतिबंधित वस्ती किंवा सील इमारतीत असल्यास त्याबातचे नियम पाळावे. महापालिका आणि पोलिसांच्या सुचनांचे पालन न करणाऱ्यांवर साथ नियंत्रण कायदा व आपत्ती निवारण कायद्यानूसार कारवाई होईल, असा इशाराही पालिका प्रशासनाने दिला आहे. या कायद्यानूसार 1 वर्षापर्यंतची कैद आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते.

सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणे घरगुती गणेशोत्सवासाठीही महापालिकेने नियमावली तयार केली आहे. मुंबईत दिड लाखाहून अधिक घरगुती गणपतींची प्रतिष्टापना होते. सार्वजनिक गणपती आगमन  आणि विसर्जनाप्रमाणेच घरगुती गणपतीसाठी पाच माणसांची अट ठेवण्यात आली आहे. तसेच, प्रत्येक ठिकाणी सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक असून मास्क फेसशिल्डचाही वापर करावा, अशी सुचना पालिकेने केली आहे. दर्शनाला येणाऱ्या नागरिकांसाठी मास्क आणि सॅनिटायझरची सोय करणेे बंधनकारक आहे.

असे करता येईल
शाडूच्या मुर्तीऐवजी घरातील संगमरवरी अथवा धातूच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करावी. शक्य असल्यास माघ महिन्यात किंवा पुढील वर्षी विसर्जन करावे. त्यासाठी मुर्तीचे पावित्र्य जपण्यास घरीच मुर्ती पवित्र कपड्यात गुंडाळून ठेवी, असे आवाहन पालिकेने केले आहे.

हे लक्षात ठेवा 

- आगमन आणि विसर्जनासाठी 5 पेक्षा जास्त माणसांना परवानगी नाही 
- शाडूची मुर्ती असल्यास घरीच विसर्जन शक्य.
- घरी विसर्जन करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करावे 
- नैसर्गिक विसर्जन तळावर जाणे टाळावे 
- घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करताना, संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगूती गणेशमूर्ती विसर्जनाची मिरवणूक एकत्र काढू नये.
- विसर्जनाची आरती घरीच करावी.
-  लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जावू नये.

-------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRPF Recruitment Row : एसआरपीएफ पोलिस भरती पेपरात ८५ प्रश्न ‘कॉपी-पेस्ट’; राज्यभर संताप, युद्धपातळीवर चौकशी सुरू

मी राजीनामा देणार नाही, भाजपने कट रचून हरवलंय; ममता बॅनर्जींचे गंभीर आरोप, पराभवानंतर घेतली पत्रकार परिषद

दररोज १५० बालकांवर अत्याचार; समाज अजूनही का गप्प? बालसुरक्षेचा ज्वलंत प्रश्न ऐरणीवर; धक्कादायक आकडेवारी समोर

Business Scheme: बिझनेस सुरू करायचाय? सरकारच्या या 5 योजना बदलतील तुमचं नशीब, मिळू शकतं तब्बल 2 कोटींपर्यंत कर्ज!

Latest Marathi News Live Update : पुरंदर विमानतळ जमीन अधिग्रहण शेवटच्या टप्प्यात

SCROLL FOR NEXT