पादचारी पुलाला ट्रेलरची धडक 
मुंबई

धक्कादायक : ट्रेलरच्या धक्‍क्‍याने पादचारी पूलच कोसळला 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावर गोवंडी येथील बैंगणवाडीसमोर गुरुवारी (ता. ३०) पहाटे ट्रेलरचा धक्का लागून पादचारी पूल कोसळला. या दुर्घटनेत चार वाहनांचे नुकसान झाले असून दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. 

कौतुकास्पद ः वाचनवृद्धीसाठी तरुणांनी हाती घेतली सायकल

दोन वर्षांपासून घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावर विविध विकासकामे सुरू आहेत. त्याअंतर्गत शिवाजी नगर ते महाराष्ट्र नगर जंक्‍शन उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्याच कामासाठी अवजड खांबाची गुरुवारी पहाटे ट्रेलरच्या साहाय्याने वाहतूक केली जात होती. उंचीच्या बाबतीत ट्रेलर चालकाचा अंदाज चुकल्याने खांब काम सुरू असलेल्या पादचारी पुलाला धडकला. धडकेमुळे पादचारी पुलाचा भाग कायम वाहनांची वर्दळ सुरू असलेल्या रस्त्यावर कोसळला. दोन टेम्पो आणि दोन रिक्षांचे त्यामुळे मोठे नुकसान झाले.

हेही वाचा : दहिसरमध्ये कारखान्याला आग 

अपघाताची माहिती मिळताच देवनार पोलिस आणि अग्निशमन दल त्या ठिकाणी तात्काळ पोहोचले. अपघातात जखमी झालेले सुरक्षारक्षक समशुद्दीन शेख (वय ४९) व ट्रेलर चालक रामकुमार सरोज (वय ४२) त्या ठिकाणी अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांची सुटका केली. गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले. ट्रेलर चालक सरोजविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची नाराजी दूर, मुलाचा उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेणार

Donald Trump: मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा; नेतन्याहू यांच्याशी वादावादीनंतर ट्रम्प यांचा भलताच प्लॅन

Pune Toxic Liquor Case: विषारी दारूसाठी रसायन पुरविणाऱ्या पिता-पुत्राला नवी मुंबईतून अटक; तपासासाठी दहा पथके

Lowest Price Electric Scooter : 50 हजारपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; सगळ्यात स्वस्त आहेत 'या' 3 गाड्या, दमदार रेंज

SCROLL FOR NEXT