Deathbodies Sakal
मुंबई

वाशी खाडीत आढळला व्यावसायिकाचा मृतदेह

पॅन कार्डवरुन पटली ओळख

रशिद इनामदार

मानखुर्द - वाशी खाडीमध्ये रविवारी (ता. १५) सकाळी प्रशांत विचारे (५४ वर्षे) या व्यावसायिकाचा मृतदेह आढळला. मृतदेह बराच काळ पाण्यात राहिल्यामुळे कुजला होता मात्र शर्टाच्या खिशामध्ये सापडलेल्या पॅन कार्डवरून त्यांची ओळख पटवण्यात यश आले.व्यवसायामध्ये झालेले नुकसान व कर्जबाजारीपणाला ते कंटाळले होते असे त्यांच्या कुटुंबीयांनी जबाबात म्हटले आहे.त्यामुळे नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलले असावे, अशी माहिती वाशी पोलिसांनी दिली.

मानखुर्द-वाशी रेल्वे मार्गावरील वाशी खाडी पुलालगत मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती नवी मुंबईच्या पोलीस नियंत्रण कक्षाला रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास मिळाली होती.त्यानुसार वाशी पोलिसांना कळवण्यात आले व वाशी पोलीस त्याठिकाणी पोहोचले.अग्निशमनदलाच्या मदतीने तो बाहेर काढण्यात आला.तो कुजलेल्या अवस्थेत होता.झडती घेतली असता शर्टच्या खिशामध्ये पॅनकार्ड आढळून आले.त्यावरून भांडुप येथील रहिवासी असलेले व्यासायिक प्रशांत विचारे असल्याची ओळख पटली.कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर तो कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT