मुंबई

धक्कादायक! आजारी पोलिसाला दाखल करून घेण्यास चार रुग्णालयांचा नकार!

अनिश पाटील : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे नागरिकांनी घरातच राहावे, यासाठी पोलिस जिवाची पर्वा न करता रस्त्यांवर पहारा देत आहेत. अशा एका आजारी पोलिसाला दाखल करून घेण्यास महापालिकेच्या चार रुग्णालयांनी नकार दिला. अखेरीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर या आजारी पोलिसाला मंगळवारी रात्री केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे पोलिस दलात नाराजी आहे.

कुर्ला वाहतूक विभागातील एका पोलिस हवालदाराने सोमवारी (ता. 20) ताप आल्यामुळे स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेतले. परंतु, प्रकृतीत फारसा फरक न पडल्यामुळे मंगळवारी सकाळी ते घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात गेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना सात रस्ता येथील कस्तुरबा रुग्णालयात जाण्यास सांगितले. त्यामुळे ते मुलाला सोबत घेऊन कस्तुरबा रुग्णालयात गेले. तेथील डॉक्टरांनी रुग्णालयात जागा नसल्यामुळे मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात जाण्याची सूचना केली. 
त्यानुसार ते नायर रुग्णालयात गेले; मात्र तेथील डॉक्टरांनीही त्यांना दाखल करून घेतले नाही आणि परळच्या केईएम रुग्णालयात जाण्यास सांगितले. त्यानंतर या आजारी पोलिसाला घेऊन त्यांचा मुलगा केईएम रुग्णालयात गेला. तोपर्यंत रात्रीचे ९ वाजले होते. आता तरी वडिलांना उपचार मिळतील, असे त्यांच्या मुलाला वाटले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना तपासले नाही आणि जागा नसल्यामुळे पुन्हा कस्तुरबा रुग्णालयात जाण्यात सांगितले. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांची मध्यस्थी
हवालदिल झालेल्या या पोलिस हवालदाराने अखेरीस वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर वरिष्ठांनी भोईवाडा पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. भोईवाडा पोलिसांनी विनंती केल्यानंतर या आजारी पोलिसाला रात्री 10 वाजता केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर वॉर्ड क्रमांक 20 मध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पोलिस दलात नाराजी पसरली आहे. सध्याच्या काळातही पोलिसाला अशी वागणूक मिळत असेल; तर सामान्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहेFour hospitals refuse to admit ill police

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT