Vaccination 
मुंबई

मुंबई: आजपासून सर्व केंद्रांवर पुन्हा लसीकरण

काय आहे बातमी?

भाग्यश्री भुवड

मुंबई: डोस उपलब्ध नसल्यामुळे घेतलेल्या विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा एकदा लसीकरण केले जाणार आहे. आज मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रांवर लसीकरण होईल अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (From today onwards vaccination start at all centers in mumbai)

मुंबईला पुण्यातुन 87 हजार डोस देण्यात आले आहेत. हे सर्व डोस मुंबईतील लसीकरण केंद्रांना वितरीत करण्यात आले आहेत. ज्यामुळे, आता सर्व लसीकरण केंद्रांवर नागरिकांसाठी डोस उपलब्ध होईल असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

सर्व केंद्रांवर पुन्हा लसीकरण

लसीच्या तुटवड्यामुळे गुरुवारी पूर्ण दिवस लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. डोस उपलब्ध झाल्यावर तात्काळ लसीकरण सुरू होईल असे सांगितले गेले होते. त्यानुसार, आज पुन्हा लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

रुग्ण दुपटीचा कालावधी ५०० दिवसांवर

मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा (corona growth rate) सरासरी दर 0.13 टक्क्यांवर आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी हा वाढून 500 दिवसांवर आला आहे. त्यामुळे मुंबईत (Mumbai) नव्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस नियंत्रणात येत असल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे. आज 961 नवीन रुग्ण सापडले तर 897 रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा एकूण संख्या 7,08,968 इतकी झाली आहे. आतापर्यंत 67,51,93 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update: यवतमाळमध्ये कडक उन्हामुळे शेतातील डिस्ट्रिब्युशन बॉक्सने घेतला पेट

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT