Anant Chaturdashi esakal
मुंबई

Mumbai Ganpati Festival : गणेशोत्सव मंडळे व मूर्तीकारांसाठी परवानगी 'इतक्या' वर्षासाठी राहणार !

Chinmay Jagtap

Mumbai Ganpati Festival : गणेशोत्सव मंडळे व शाडूच्या मातीच्या मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांसाठीच्या परवानग्या पाच वर्षांसाठी वैध राहणार आहेत. त्यामुळे मंडळांना आता दरवर्षी परवानगी घेण्याची गरज नाही. तसे निर्देश पालक मंत्री दीपक केसरकर यांनी यंत्रणांना दिले आहेत. मुंबईकरांसाठी गणेशोत्सव कालावधीत भाविकांना पिण्याचे पाणी, निर्माल्य, पार्किंग, बस आणि रेल्वे सेवा तसेच शौचालयाची सुविधा पुरविण्याबाबत आज झालेल्या बैठकीत प्रशासनाला निर्देश देण्यात आले.

मुंबई महापालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागाच्या सभागृहात झालेल्या बैठकीला मुंबई पोलिस, रेल्वे, बेस्ट, रेल्वे सुरक्षा बल इत्यादींसारख्या विविध प्राधिकरणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुंबई पालिकेच्या अधिकारी वर्गाचीही बैठकीला उपस्थिती होती. गणेशोत्सव मंडळांना यापुढे मंडप परवानगीचा अर्ज दरवर्षी ऑनलाईन करावा लागणार नाही.

एकदा ऑनलाईन घेतलेली परवानगी पाच वर्षांसाठी वैध ठरेल. ज्यामुळे मूर्तिकारांना प्रत्येक वर्षी परवानगी घ्यावी लागणार नाही. ही परवानगीही पाच वर्षांसाठी वैध राहील. पुढील वर्षी एप्रिलमध्ये मूर्तिकारांना शाडूची माती उपलब्ध करून देण्यात येईल, असे पालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

विनामूल्य पार्किंग

बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीने याआधीच्या बैठकीत मांडलेल्या विविध ५२ मुद्द्यांवर करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती उपआयुक्त रमाकांत बिरादार यांनी दिली. त्याअंतर्गत प्रामुख्याने यंदाच्या गणेशोत्सवासाठी विसर्जन स्थळाच्या नजीकच्या भागातील सार्वजनिक वाहनतळावर विसर्जन दिवशी २४ तास विनामूल्य सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. प्रमुख विसर्जन स्थळी भाविकांना पाण्याच्या बाटल्या पुरविण्यात येतील. भाविक व गणेशोत्सव मंडळांच्या निर्माल्यांच्या व्यवस्थेसाठी घनकचरा व्यवस्थापन विभाग सुसज्ज व तयार आहे. विसर्जन परिसरातल्या शौचालयाची सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

रात्रभर बेस्ट सेवा गणेशोत्सव काळात मुंबईत फिरणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्ट आणि रेल्वेने रात्रभर सेवा उपलब्ध करून द्यावी, अशाही सूचना दीपक केसरकर यांनी रेल्वे विभागाला बैठकीदरम्यान केल्या. विसर्जन स्थळाच्या परिसरात पुरवण्यात येणाऱ्या सुविधांचे फलक लावून जनजागृती करा. विसर्जन मिरवणूक मार्गावर चिन्हे आणि दिशादर्शक फलक व खुणांचा वापर करा, अशा सूचनाही त्यांनी पोलिस आणि महापालिका प्रशासनाला केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT