Uddhav Thackeray And Gautam Adani 
मुंबई

Gautam Adani : भारताचे कुबेर उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर; कारण अस्पष्ट

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यामुळे संपूर्ण शिवसेना अडचणीत आली आहे. आमदारांपाठोपाठ खासदार देखील शिंदे गटात गेल्याने शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. मात्र आज जगातील तिसऱ्या क्रमांकाचे आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी हे थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला दाखल झाले आहेत. (Gautam Adani news in Marathi)

दरम्यान उद्धव ठाकरे आणि गौतम अदानी यांच्या भेटीचे कारण अस्पष्ट आहे. मात्र या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. अदानी यांनी भाजपनेते आशिष शेलार यांचीही भेट घेतली आहे. त्यामुळे अदानी यांच्या राजकीय भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

आज संध्याकाळी मुंबईतील नेक्सो मैदानावर उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या गटप्रुमखांना संबोधित करणार आहेत. मात्र त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. दरम्यान, दिल्लीतील पत्रकार परिषदेत शिंदे एखादी मोठी घोषणा करणार असल्याचेही सूत्रांकडून सांगितले जात आहे. त्याशिवाय शिंदे यांच्या समवेत यावेळी काही महत्त्वाचे नेतेदेखील उपस्थित असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest: ''दलितांना, शेतकऱ्यांना भडकावल्यानंतर आता विद्यार्थ्यांना चेतवलं जातंय'', दिल्ली आंदोलनावर योगी आदित्यनाथांचं वादग्रस्त विधान

Loni Kalbhor Police: लोणी काळभोर पोलिसांची एंजल हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा व महिला संरक्षणावरील जनजागृती कार्यशाळा

Career Numerology : 'या' 3 मुलांकाचे लोक वारंवार नोकरी बदलतात; पण याच निर्णयामुळे बनतं लाखोंचं करिअर

National Cycle Competition : मणीपूरचा अथोकपम बीके सिंग पुणे-बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा यंदाचा विजेता....

Live Updates Marathi: शिवाजी पार्कातील आंदोलकांच्या भेटीसाठी राज ठाकरे दाखल

SCROLL FOR NEXT