Video Viral sakal
मुंबई

CCTV कॅमेऱ्यावर छत्री ठेवून महिलेने चप्पल चोरली; उच्चभ्रू सोसायटीतील घटना, घटनेचा Video Viral

मुंबईतील घाटकोपर येथील एका सोसायटीतील ही घटना आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : उच्चभ्रू सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेरा छत्रीने झाकून चप्पल चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये दोन महिला त्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मुंबईतील घाटकोपर येथील एका सोसायटीतील ही घटना आहे.

अधिक माहितीनुसार, घाटकोपर येथील वसंत विहार सोसायटी आणि वल्लभबाग लेनवरील कमलकुंज सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे. २० आणि २८ ऑगस्ट रोजी हा प्रकार समोर आला असून सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सदर प्रकरणी घाटकोपर आणि पंत नगर पोलिस ठाण्यात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला सोसाटीतील पायऱ्या उतरून खाली येते आणि तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर छत्री ठेवून दारासमोर असलेल्या चप्पल स्टँडमधून चप्पल चोरी करते. तिच्या साथीला अजून एक महिला असल्याचंही दिसत आहे. पण या दोन्ही महिलांचे चेहरे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहेत.

दरम्यान, याप्रकरणी अजून गुन्हा दाखल करण्यात आला नसून उच्चभ्रू सोसायटीमधून चप्पल चोरी होण्याच्या प्रकारात लक्षणीय वाढ झाली आहे. पण चोरी करताना हातातील छत्रीने सीसीटीव्ही कॅमेरा झाकल्याचा प्रकार पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. या महिला त्याच इमारतीमध्ये घरकाम करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT