coastal road sakal
मुंबई

Girgaon Chaupati : कोस्टल रोडमुळे गिरगाव चौपाटीवर नो एंट्री

मुंबई दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांना यापुढचे काही दिवस गिरगाव चौपाटीवर समुद्राच्या पाण्यात मजामस्ती करण्याचा आनंद घेता येणार नाही.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांना यापुढचे काही दिवस गिरगाव चौपाटीवर समुद्राच्या पाण्यात मजामस्ती करण्याचा आनंद घेता येणार नाही.

मुंबई - मुंबई दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांना यापुढचे काही दिवस गिरगाव चौपाटीवर समुद्राच्या पाण्यात मजामस्ती करण्याचा आनंद घेता येणार नाही. मुंबईत पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामापैकी एक कोस्टल रोडचे काम गिरगाव चौपाटी परिसरात सुरू झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या भागात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यापुढचे काही दिवस गिरगाव चौपाटीचा परिसर हा प्रकल्पाच्या कामामुळे प्रतिबंधित क्षेत्र असणार आहे. त्याचा फटका हा स्थानिक पर्यटनाला बसतानाच सर्वसामान्यांनाही या परिसरात जाता येणार नाही. कोस्टल रोडच्या प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाच्या निमित्ताने पालिकेने या प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे उदिष्ट ठेवले आहे. त्यासाठीच प्रकल्पाअंतर्गत मनुष्यबळ आणि मशीनरीही वाढवण्यात आली आहे. येत्या नोव्हेंबर २०२३ पर्यंत कोस्टल रोड प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे पालिकेने उदिष्ट ठेवले आहे. त्यासाठीच संलग्न कामांसाठी आवश्यक असणारी परवानगी गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये देण्यात आली आहे.

कोस्टल रोडच्या कामाअंतर्गत भूमीगत टनेल करण्यात येत आहे. या टनेलचे पाणी काढण्यासाठीच याठिकाणी चौपाटी परिसरात बॅरिकेंटीग करण्यात आले आहे. कोस्टल रोडच्या कामामुळे पहिल्यांदाच गिरगाव चौपाटी परिसर सर्वसामान्यांसाठी बंद असणार आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये आणि पर्यटकांमध्येही नाराजी आहे. गिरगाव चौपाटीपासून ते हॅंगिंग गार्डन परिसरात कोस्टल रोडचा टनेलचा मार्ग असणाार आहे. त्यासाठी डाऊन मार्गावर सध्या टनेलचे काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT