मुंबई

बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महापौरांकडून बोनस जाहीर

तुषार सोनवणे

मुंबई - बृहृन्मुंबई महानगरपालिकेकडून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना 15 हजार 500 रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला, त्यामुळे बेस्ट बस उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनाही बोनस कधी जाहीर होणार याबाबत चर्चा सुरू होती. महापौर किशोरी पेडणेकर यांनी बेस्ट बस कर्मचाऱ्यांसाठीही बोनसची घोषणा केली आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना 10 हजार 100 रुपये इतके सानुग्रह अनुदान दिवाळी बोनस म्हणून जाहीर केले आहे. महापौरांनी ही माहिती भायखळ्यातील आपल्या निवासस्थानी आय़ोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. बीएमसी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळालेल्या दिवाळी बोनसच्या पार्श्वभूमीवर बेस्ट कर्मचाऱ्यांनाही बोनस मिळावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 3 नोव्हेंबर रोजी वर्षा या निवासस्थानी बैठक झाली होती. या बैठकीत बेस्ट कर्मचारी युनियनने मुख्यमंत्र्यांकडे कोरोनामुळे हवालदिल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी बोनसची मागणी केली होती. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली होती.त्यामुळे बीएमसी कर्मचाऱ्यांप्रमाणेच कोरोना काळात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांचीही दिवाळी गोड होणार आहे. 

Good news for the best employees Bonus announced by the mayor

------------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : सरकार जाणूनबुजून हलगर्जीपणा करत आहे : मनोज जरांगे पाटील

Vivoचा मोठा धमाका! Vivo Y31t 5G ची किंमत झाली फक्त 24,695; Flipkart वर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी...

गर्दीत बसमध्ये चढताना धक्का लागून पडली, एसटीच्या चाकाखाली चिरडून १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू; आईच्या डोळ्यादेखत घटना

SCROLL FOR NEXT