मुंबई

कोकणात जाणाऱ्या चाकमान्यांसाठी खुश खबर; मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला मोठा निर्णय

प्रशांत बारसिंग


मुंबई : कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस टोल मधून मिळणार सवलत मिळणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

एकनाथ शिंदे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, कोकण विभागातील पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्तांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. टोल सवलतीसाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी स्थानिक पोलीस स्थानकात वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव आणि प्रवासाची तारीख नमूद केल्यास त्यांना तात्काळ टोल माफी स्टिकर मिळणार आहे. त्यासाठी नागरीकांनी जवळच्या पोलिस स्थानकाशी संपर्क साधावा असे शिंदे यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासाआधी राज्य शासनाच्या नियमांनुसार कोरोनाची चाचणी आणि ई-पास काढणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ प्रादेशिक परिवहन अधिकारी  आणि पोलीस अधिकारी यांनी समन्वय ठेवून गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी  दिल्या.

--------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather News Maharashtra : पुणेकरांनो सावधान! घाटमाथ्यावर रेड अलर्ट; राज्यात २५ जिल्ह्यात पावसाची शक्यता, पुढचे चार दिवस असा असेल अंदाज

कर्जमाफीची तारीख ठरली! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या पंढरपुरात ५ शेतकऱ्यांना मिळणार ‘कर्जमुक्ती’; पहिल्यांदा २ लाखांपेक्षा कमी थकबाकीदार शेतकऱ्यांचे ७/१२ कोरे

Rahul Gandhi: राजीनामा द्या, माफी मागा: राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका, ‘पोलिसांनाही सरकार नकोय’

आजचे राशिभविष्य - 23 जुलै 2026

मोठा निर्णय! सोलापुरातील आयटी पार्कचा मार्ग मोकळा; पाटबंधारे विभागाकडून ‘MIDC’ला १०० एकर मोफत; उद्योजकांना २००० रुपये प्रति स्क्वेअर मीटर दराने जागा

SCROLL FOR NEXT