Govt Mega Recruitment for Talathi bharati 2023 Advertisement for 4644 posts published mumbai esakal
मुंबई

Talathi Recruitment : तलाठी पदासाठी सरकारची मेगा भरती; ४,६४४ पदांची जाहिरात प्रसिद्ध

महसूल विभागाने आज राज्य सरकारने घोषित केलेल्या ७५ हजार मेगा भरतीमधील तब्बल ४,६४४ तलाठी पदांची जाहिरात प्रसिद्ध

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महसूल विभागाने आज राज्य सरकारने घोषित केलेल्या ७५ हजार मेगा भरतीमधील तब्बल ४,६४४ तलाठी पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर तलाठी पदभरती मोठया संख्येत होत असल्याने स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी त्याचे स्वागत केले आहे.

विविध जिल्ह्यांतील तलाठींची एकूण ४,६४४ रिक्त पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र शासनाकडून या भरतीसाठी १७ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०२३ दरम्यान परीक्षा घेण्यात येणार आहे. मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी आणि पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झालेले उमेदवार तलाठी भरतीसाठी अर्ज करू शकतात.

भूमी अभिलेख विभागाकडून तलाठी भरती परीक्षा घेण्यात येणार असून लवकरच परीक्षेची लिंक खुली करण्यात येणार आहे. ही परीक्षा ‘टीसीएस’ कंपनीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. दरम्यान, या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यातून अर्ज भरल्यास ते बाद करण्यात येतील, याची नोंद घेण्याचे आवाहन महसूल विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amul Raises Milk Prices: महागाईचा आणखी एक फटका! अमूलने वाढवले दुधाचे दर, जाणून घ्या नवीन दर कधीपासून लागू होतील?

Mumbai Local: रेल्वे व्यवस्थापकांचे आंदोलन, पण प्रवाशांचा खोळंबा! ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकल विस्कळीत; काही गाड्या रद्द

१०,०००+ धावा, ३५०+ विकेट्स... स्टार खेळाडूची प्रथम श्रेणी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती; भारतात पदार्पणातील सामन्यात चमकलेला...

NEET paper leak: पुण्यात ब्युटी पार्लरवाली मनिषा अन् राहुरीचा एजंट धनंजय नेट पेपरफुटीचे खरे मास्टरमाईंडच, काय घडलं?

Mumbai University Renaming: मुंबई विद्यापीठाला ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ नाव देण्याची मागणी; साहित्य परिषदेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT