मुंबई

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लेखनिक, वाचक बॅंक

सकाळवृत्तसेवा

मुंबई - पहिली ते बारावीपर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लेखनिक मिळण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असावेत, यासाठी लेखनिक आणि वाचक बॅंक तयार केली जाणार आहे. खास बाब म्हणून प्रौढ लेखनिकांबरोबरच जवळच्या नातेवाइकांनाही लेखनिक व वाचक मुख्याध्यापकांच्या परवानगीने निवडता येणार आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लेखनिक वाचक मिळण्यासाठी अनेकदा अडचणी निर्माण होत असल्याने तालुका पातळीवर इच्छुकांची लेखनिक व वाचक बॅंक तयार केली जाणार आहे. प्रौढ लेखनिक व वाचक हे शाळेतील किंवा अन्य शाळेतील शिक्षक, खासगी शिकवणी वर्गातील शिक्षक, विद्यार्थ्याचे जवळचे नातेवाईक नसावेत, असे शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, खास बाब म्हणून जवळच्या नातेवाइकांना लेखनिक व वाचक म्हणून परवानगी देण्याचे अधिकार शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.

लेखनिक, वाचक बॅंकेमध्ये नोंदणीकृत झालेल्यांची माहिती विभागाच्या पोर्टलवर टाकण्यात येणार आहे. मात्र, यासाठी निःस्वार्थी भावनेने सेवा देणाऱ्यांचाच सहभाग घ्यावा, यासाठी कोणतेही मानधन दिले जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Live Updates Marathi : राहुल गांधी छत्रसाल स्टेडियममध्ये, कार्यकर्ते आक्रमक

IND vs ZIM: झिम्बाब्वेत वैभव सूर्यवंशीची खरी परीक्षा! पहिला सामना कधी, किती वाजता; संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

राहुल गांधींच्या नाकातून रक्तस्त्राव! ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांकडून मारहाण? काँग्रेसची अधिकृत पोस्ट

Manchar News : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात पुणे जिल्ह्याची दुहेरी बाजी; काळवाडी प्रथम, कडाचीवाडीला पाणी व्यवस्थापनाचा विशेष पुरस्कार

Rahul Gandhi Protest: राहुल गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात; चर्चेत काय घडलं? सरकारकडून आंदोलकांवर शब्द फिरवल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT