मुंबई

मुंबई विद्यापिठाने सुरू केलेली हेल्पलाईन ठप्प; फस्ट इयरच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अडचणी

तेजस वाघमारे


मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. प्रवेश नोंदणी अर्ज भरण्यातील विद्यार्थाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. विद्यार्थांना अर्ज भरतेवेळी येणाऱ्या अडचण दूर करण्यासाठी विद्यापीठाने सुरू केलेली हेल्पलाईनही ठप्प झाली आहे. यातच काही विद्यार्थांना एखाद्या महाविद्यालयाचे कोड दिसतात तर दुसऱ्या विद्यार्थांना त्या महाविद्यालयाचा कोड उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थी आणि पालक हैराण झाले आहेत.

बारावी निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थांना प्रथम विद्यापीठाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. 22 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थांना विद्यापीठाकडे ऑनलाइन नोंदणी अर्ज भरता येणार आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विद्यार्थी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी अर्ज भरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हे अर्ज भरताना विद्यार्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

विद्यापीठाचे संकेतस्थळ खूप धिम्या गतीने सुरू असल्याने अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना एक दिवस द्यावा लागत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी करत असतानाच आता महाविद्यालयांचे कोड एका विद्यार्थास उपलब्ध होतात. मात्र दुसऱ्या विद्यार्थांस त्याच कोडचे महाविद्यालयाचा पर्याय उपलब्ध होत नसल्याचे विद्यार्थांच्या पालकांनी सांगितले. अर्ज भरण्यात अडचण येत असल्याने हेल्पलाईनला कारवार संपर्क साधला असता हा क्रमांक अस्तित्वात नसल्याचे सांगितले. तसेच बीएमएमच्या पहिल्या वर्षी ॲडमिशन घेण्यासाठी कोर्स उपलब्ध नसल्याचे संकेतस्थळावर सांगण्यात येत असल्याने विद्यार्थी आणि पालक हैराण झाले आहेत. याविषयी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

विद्यापीठाने प्रवेश प्रक्रिया राबविण्यास सुरुवात करण्यापूर्वी संकेतस्थळाची चाचणी घेतलेली दिसत नाही. विद्यार्थांच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरु केली. पण ती बंद आहे. विद्यापीठाने विद्यार्थांना वाऱ्यावर सोडले आहे. कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थी आणि पालकांना घरातूनच प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करता यावी, यासाठी विद्यापीठाने सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
- संजय वैराळ - माजी सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ

----------------------------------------------------

Edited by Tushar Sonawane 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT