मुंबई

'तलाव आपल्या घरी'! वसईत 72 फिरत्या कृत्रिम तलावांच्या माध्यमातून होणार बाप्पाचे विसर्जन

विजय गायकवाड

नालासोपारा - कोरोना काळात सार्वजनिक ठिकाणी अथवा विसर्जनस्थळावर गणेशभक्तांची गर्दी होऊ नये यासाठी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वसई ताल्युक्यात 72 कृत्रिम फिरते तलावाची व्यवस्था केली आहे. प्रत्येक प्रभागनिहाय 'तलाव आपल्या घरी' ही संकल्पना राबविण्यात येत आहे. गणेशभक्तांच्या सेवेसाठी कृत्रिम फिरते तलाव वाहनांवर सज्ज झाले आहेत. नोंदणी केलेल्या गणेशभक्तांच्या घरोघरी जाऊन त्यांच्याच सोसायटीत सर्व विधी करून गणेशाचे विसर्जन करणार असल्याची बविआचे सचिव आजीव पाटील यांनी 'सकाळ' ला दिली आहे.

वसई विरार नालासोपारा परिसरात कोरोनाबाधितांचा आकडा 15600 च्या पार केला आहे. त्यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि गणेशभक्तांच्या सुविधेसाठी 72 कृत्रिम फिरत्या तलावाची सुविधा केली आहे. हे सर्व कृत्रिम फिरते तलाव हे  3 चाकी, 4 चाकी वाहनांना वर असणार आहेत. ज्यांच्या घरात माणस कमी आहेत, आर्थिक अडचण आहे. कोणतेही साधन नाही पण त्यांना त्यांच्या गणेशाचे विसर्जन तलावात करायचे आहे अशा गणेश भक्तांनी संपर्क केल्यास कार्यकर्ते स्वतःहून श्रींची मुर्ती तलावात विसर्जन करणार आहेत.

वसई ताल्युक्यातील सर्व गणेश भक्तांनी बाहेर गर्दी टाळण्यासाठी तेथील संबधित बविआच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून अधिकची माहिती घेता येईल असे बविआकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT