Imtiyaz-Jaleel sakal
मुंबई

मी खासदार आहे की दहशतवादी ; इम्तियाज जलील यांचा सवाल

आमच्या देशाचा झेंडा आहे, तो आम्ही काढणार नाही ; इम्तियाज जलील

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ऑल इंडिया मुस्लीम इत्तेहादूल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel)यांच्या राज्यभरात निघालेल्या तिरंगा रॅलीचा मुंबईतील चांदीवली (Chandvali) येथे समारोप झाला. यावेळी मुंबई (Mumbai)पोलिसांनी आपल्याला जागोजागी अडवल्याचा आरोप ही जलील यांनी केला. मी खासदार आहे की दहशतवादी असा सवाल करत आपण पोलिसांना जाब विचारल्याची माहिती ही जलील यांनी दिली.

औरंगाबादहून 100 गाड्यांच्या ताफा घेवून निघालेले एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल अखेर मुंबईत पोहोचले.

मुंबईत एमआयएम पक्षाच्या रॅलीला प्रवेश नाकारणाऱ्या मुंबई पोलिसांनी अखेर प्रवेश द्यावा लागला. वाशी टोल नका,गोवंडी,चुनाभट्टी या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला मात्र एमआयएम कडून जोरदार विरोध झाल्यानंतर अखेर त्यांना प्रवेश देण्यात आला. मुस्लिम समुदायाला 5 टक्के आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीचे संरक्षण या मुख्य मागण्यांसाठी एमआयएमच्या वतीने मुंबईतील चांदीवली येथे आयोजित सभेत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेसाठी राज्यभरातून काढण्यात आलेल्या रॅलीला अखेर पोलिसांनी फारशी आडकाठी न आणता मुंबईत प्रवेश करण्यास परवानगी दिली. त्यामुळे औरंगाबादहून 100 गाड्यांच्या ताफा घेवून निघालेले एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल अखेर मुंबईत पोहोचले.

एमआयएमने आयोजित केलेल्या मोर्चा आणि जाहिर सभेला मुंबई पोलिसांनी वाढत्या ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर परवानगी नाकारली होती. तसे आदेशही मुंबई पोलिस आयुक्तांनी जारी केले. हा मोर्चा होवू नये यासाठी पोलिसांनी खा. इम्तियाज जलिल यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र एमआयएमची रॅली मुंबई पोलीस रोखू शकले नाहीत. जातील सायंकाळी 7 च्या दरम्यान मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या वाशी टोलनाका येथे पोचले. तेथे काही काळ इम्तियाज जलिल यांना पोलिसांनी रोखले. त्यांच्या गाडीवरील राष्ट्रध्वज ही पोलिसांनी उतरविण्यास सांगितले. परंतु एमआयएमच्या कार्यकर्ते आणि खासदार इम्तियाज जलिल यांनी त्यास नकार दिला.त्यानंतर या ताफ्यास पोलिसांनी पुढे जाण्यास परवानगी दिली. त्यानंतर ताफा सोमय्या मैदानाजवळ पोहोचल्यानंतर तेथेही मुंबई पोलिस उपायुक्त दराडे यांनी या ताफ्याला अडवित तुम्ही मुंबईत जावू शकता, पण गाडीवरील राष्ट्रध्वज काढा असे सांगितले.

खासदार इम्तियाज जलील यांनी हा आमच्या देशाचा झेंडा आहे, तो आम्ही काढणार नाही. हवे तर आमच्या गाड्या रोखा, आम्ही चालत सभेच्या ठिकाणी जावू, पण झेंडा गाड्यांवरून उतरविणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी जलील यांच्या गाड्यांना पुढे जाण्यास परवानगी दिली. परंतु या गाड्यांच्या पुढे पोलिसांची गाडी सुरुवातीस ठेवण्यात आली. गोवंडीजवळ आल्यानंतर पोलिसांनी पुन्हा त्यांना काही वेळासाठी थांबवून काही गोष्टींची विचारणा केली. त्यानंतर पुन्हा पोलिसांनी त्यांना पुढे घेवून जाण्यास सुरुवात केली. सुरुवातीला एमआयएमच्या रॅलीला आणि खासदार असुवुद्दीन ओवेसी यांच्या सभेला परवानगी नाकारणाऱ्या पोलिसांनी पुन्हा या मोर्चाला मुंबईत प्रवेश दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP: युट्युबर सलीम वास्तिक यांच्यावर भरदिवसा हल्ला! CM योगी अ‍ॅक्शन मोडवर; AIMIM नेत्यासह ५ जणांवर गुन्हा, काय आहे प्रकरण ?

Latest Marathi News Live Update : अमेरिका-इराण तणावातही सोमवारी सोने, चांदी चढउतार सुरू

Budget 2026: कोस्टलचे पुढचे टप्पेही मार्गी! महापालिकेच्या अर्थसंकल्पात १,९५० कोटींची तरतूद

Agricultural Crisis : इराण-इस्रायल संघर्षाची झळ भारताला; 'केप ऑफ गुड होप'च्या फेऱ्याने निर्यात महागणार!

T20 WC, IND vs WI: 'चांगल्या लोकांसोबत नेहमीच...', संजू सॅमसनच्या मॅच विनिंग कामगिरीनंतर सूर्यकुमार भावूक; Video

SCROLL FOR NEXT