मुंबई

कल्याणमध्ये तरुणी आणि दोन तरुणांना जमावाकडून पट्ट्याने मारहाण

पट्ट्याने मारहाण केली.

रविंद्र खरात

कल्याण: कल्याण (kalyan area) कोळसेवाडीत घडलेल्या प्रकारानंतर राज्यात कायदा-सुव्यवस्था (law & order) उरली नाहीय का? असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. कल्याण कोळसेवाडी (kolsewadi) विभागात दोन तरुण आणि एक तरुणीला जमावाने बेदम मारहाण (beaten mercilessly) केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. (In kalyan area two youth & girl beaten mercilessly by crowd)

एक तरुणी रात्रीच्या सुमारास रिक्षामधून प्रवास करत होती. त्यावेळी रिक्षा चालकाने तिच्याशी छेडछाड केल्याचा आरोप तिने केला. तिने लगेच फोन करुन या बद्दल आपल्या मित्रांना कळवले. तिचे मित्र लगेच त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी रिक्षा चालकाचा समाचार घेतला. त्याची गाडी फोडण्याचा प्रयत्न केला.

हा प्रकार तिथल्या जमावाने पाहिल्यानंतर रिक्षाचालक आणि तेथील जमावाने या तरुणांना जबर मारहाण केली. राहुल गडेकर आणि बंटी प्रधान असे मारहाण झालेल्या तरुणांची नावे आहेत. ते उल्हासनगर विभागात राहतात. जमावाने या दोन्ही तरुणांना लाथा-बुक्क्याने अगदी पट्ट्याने मारहाण केली. या तरुणीलाही यात मारहाण झाली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

किरीट सोमय्या

कल्याण कोळसे वाडी परिसरात तरुण मुलीची छेडछाड व तिच्या मदतीला आलेल्या दोन तरुणांना मारहाण करणाऱ्यांना अटक करण्यात पोलीस दिरंगाई करत आहेत. मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress spokesperson assaulted Video : काँग्रेस प्रवक्त्यास पुण्यात मारहाण!, प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी ट्वीट केला घटनेचा व्हिडिओ

टी-२० विश्वचषक सामन्यावर सट्टेबाजी! स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली कठोर कारवाई

T20 WC, WI vs ZIM: ७ चौकार, ७ षटकार... वानखेडेवर हेटमायरचं वादळ; झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडपत विंडीजसाठी रचला वर्ल्ड रेकॉर्ड

Latest Marathi News Live Update : वीज कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Virar News : मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे संदर्भात जपान आंतरराष्ट्रीय संस्था JICA यांची वसई-विरार शहर महानगरपालिकेला भेट

SCROLL FOR NEXT