मुंबई

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 500 दिवसांवर

काय आहे बातमी?

मिलिंद तांबेः सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा (corona growth rate) सरासरी दर 0.13 टक्क्यांवर आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी हा वाढून 500 दिवसांवर गेला आहे. त्यामुळे मुंबईत (Mumbai) नव्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस नियंत्रणात येत असल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे. आज 961 नवीन रुग्ण सापडले तर 897 रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा एकूण संख्या 7,08,968 इतकी झाली आहे. आतापर्यंत 67,51,93 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. (In mumbai corona doubling rate reaches to 500 days)

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 16,612 हजारांवर आला आहे. मुंबईत आज 897 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 6,75,193 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

मुंबईत आज दिवसभरात 27 रुग्णांचा मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा आकडा 14 हजार 965 वर पोहोचला आहे. आज मृत झालेल्यापैकी 18 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 18 पुरुष तर 9 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 1 रुग्णांचे वय 40 वयोगटाच्या खालील होते. 6 रुग्णांचे वय 40 ते 60 वयोगटातील होते तर 20 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते.

मुंबईत 33 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 145 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 11,639 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये  अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल 877 करण्यात आले.  

धारावी 1 नवे रुग्ण

धारावीत आज 1 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या 6829 वर पोहोचली आहे. दादर मध्ये आज 6 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 9466 झाली आहे. माहीम मध्ये 17 रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण 9802 इतके रुग्ण झाले आहेत.जी उत्तर मधील रुग्णसंख्या कमी झाली आहे. जी उत्तर मध्ये आज 24 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 26,097 झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुढील ३ दिवस महत्त्वाचे! राज्यात पावसाचा जोर वाढणार, विजांच्या कडकडाटासह मुसळधारेचा अंदाज; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Inspirational Story: अनवाणी पायाने धावली आई! बीडमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी जिंकली मॅरेथॉन...

Jotiba Dongar News : ऊन सावली अन् विक्रमी गर्दीत रंगली जोतिबाची नगर प्रदक्षिणा...

Marathi News Live Updates : BPSC TRE 4 मधील ३२,३८८ रिक्त पदांसाठीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढे ढकलली

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

SCROLL FOR NEXT