Eknath Shinde sakal
मुंबई

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेत रखडली नवी मुंबईतील विकासकामांची उद्घाटने व भूमिपुजने

Navi Mumbai : आचारसंहिता लागण्याआधी प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Eknath Shinde: लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीपूर्वी नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील काही प्रकल्प हे पूर्ण झाले असून त्यांचे लोकार्पण व काही प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या प्रकल्पांच्या उद्घाटनांसाठी पालिकेने तयारी केली आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील ऐरोली विभाग कार्यालया अंतर्गत असणारी यादव नगर शाळेची इमारत बांधून पूर्ण आहे. ऐरोली सेक्टर तीन येथील अग्निशमन केंद्राचीदेखील इमारत पूर्ण झालेली आहे. घणसोली विभाग कार्यालयांतील सेक्टर १५ मधील नवी मुंबई महापालिकेची शाळा बांधून पूर्ण आहे.

कोपरखैरणे सेक्टर १४ मधील नागरी आरोग्य केंद्र, वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृहात असणारे वाचनालय, बेलापूर विभाग कार्यालया अंतर्गत असणारे नेरूळ सेक्टर ४८ येथील डे-केअर सेंटर, सेक्टर ३८ येथील वृद्धाश्रम, बेलापूर सेक्टर १५ येथील पार्किंग इमारत, नेरूळ सेक्टर ३० येथील नवी मुंबई महापालिका शाळा बांधून पूर्ण आहे.

तुर्भे सेक्टर २२ येथील बहुउद्देशीय इमारत, सानपाडा सेक्टर चार येथील दैनंदिन बाजाराची इमारत, सानपाडा सेक्टर पाच येथील वुमन वेल्फेअर सेंटर व सीनिअर सिटिझन सेंटर, नेरूळ जुईनगर सेक्टर २३ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयही बांधून पूर्ण आहे.

या प्रकल्पांचे उद्घाटन व तुर्भे येथील विभाग कार्यालयांचे व ऐरोली सेक्टर १० येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यामुळे आचारसंहिता लागण्याआधी प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काही प्रकल्पांचे भूमिपूजन, तर काही प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ घेण्यात येत असून त्यानंतर तयार प्रकल्पांची उद्घाटने, तसेच होणाऱ्या कामांची भूमिपूजने करण्यात येतील.

- राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...

FDA Crime : अस्वच्छतेमुळे १० हॉटेल, बेकरींचे परवाने निलंबित

Vijeta Dahiya: कोण आहेत विजेता दहिया? बर्गर खाल्ल्यामुळे 'सीजेपी'चं प्रवक्तेपद गमावलं, व्हिडीओ झाला होता व्हायरल

Mulshi Dam Water : मुळशी धरणाच्या सांडव्यातून मुळा नदीत ८ हजार १०० क्यूसेक्सने विसर्ग सुरू.....

Pune Water Supply : पुण्यात पाणी कपात नाही! महापौर मंजूषा नागपुरेंची घोषणा

SCROLL FOR NEXT