मुंबई

कंगनाच्या अडचणींमध्ये आणखी वाढ; जावेद अख्तर यांनी दाखल केला मानहानीचा दावा

सुनिता महामुनकर


मुंबई : सुसाट विधाने करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. आता गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाने रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये जावेद यांचा उल्लेख केला होता. यामध्ये तिने अख्तर यांच्या बाबत वादग्रस्त विधाने केली आहेत.

या व्हिडिओला यू ट्यूबवर लाखो हिटस मिळाल्या आहेत. या संवेदनशील प्रकरणात माझा संबंध नसताना माझ्यावर धादांत खोटे आणि आधारहिन आरोप कंगनाने केले आहेत. यामुळे माझी अकारण मानहानी झाली असून तीने नाहक मनस्ताप दिला आहे, त्यामुळे तिच्यावर फौजदारी खटला चालवावा, अशी मागणी अख्तर यांनी दाव्यामध्ये केली आहे. भादंवि कलम 499 आणि  500 नुसार बदनामी केल्याचा खटला दाखल करण्याची मागणी केली आहे.

कंगनाने बॉलीवूडमध्ये माफिया राज असल्याचा आरोप सोशल मिडियावर आणि रिपब्लिकच्या एका मुलाखतींमध्ये केला आहे. दिग्दर्शक महेश भट आणि अख्तर यांचा यामध्ये उल्लेख केला होता. यूट्यूबवर या व्हिडीओला लाखो हिटस मिळाले आहेत. 

कंगनाच्या विरोधात याआधीही दोन फिर्यादी दाखल झाल्या आहेत. यापैकी एक वांद्रे न्यायालयात तर एक अंधेरी न्यायालयात आहेत. वांद्रे पोलिसांनी यासंबंधी चौकशी सुरू केली आहे.

increase difficulties of kangana ranaut, Javed Akhtar filed a defamation case

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : धनगर आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, आमदार गोपीचंद पडळकर सहभागी

'ठरलं तर मग' मालिकेतील दोन अभिनेत्यांचा मुंबई लोकलने प्रवास; आला असा अनुभव, म्हणाले- एका स्टेशनवर पोलीस...

Numerology Insights: पहिल्याच भेटीत जिंकतात सर्वांचे मन! 'या' ३ मूलांकांचे लोक मानले जातात खरे 'सोशल बटरफ्लाय'!

SCROLL FOR NEXT