indian navy  sakal media
मुंबई

भारतीय नौदलाच्या कमांडोंकडून आफ्रिकी नौसैनिकांना विशेष प्रशिक्षण

- कृष्ण जोशी

मुंबई : केनियामध्ये (kenya) होत असलेल्या कटलास एक्सप्रेस या बहुराष्ट्रीय सागरी कवायतींसाठी गेलेल्या भारतीय नौदलाच्या (Indian navy) मार्कोस कमांडोंनी आफ्रिकी देशांच्या (African countries) तसेच जॉर्जियाच्या नौसैनिकांना अतिरेकीविरोधी कारवायांचे विशेष प्रशिक्षण (Special training) दिले. ( Indian Navy commandos gives special training African navy-nss91)

नौदलाचे मार्कोस हे कमांडो अतिरेकीविरोधी कारवायांमध्ये निष्णात आहेत. कौशल्य, ताकद, कार्यक्षमता याबाबत अमेरिकेचे सील कमांडो सर्वश्रेष्ठ मानले जातात, पण मार्कोस कमांडोदेखील त्यांच्या तोडीसतोड आहेत. उरण येथे मुख्य तळ असलेल्या मार्कोस कमांडो पथकाने 2008 मधील कसाब च्या अतिरेकी हल्ला निष्प्रभ करण्यासाठी सेनादलाचे विशेष कमांडो येईपर्यंत महत्वाची कामगिरी बजावली होती. सध्या हे कमांडो आयएनएस तलवार या भारतीय युद्धनौकेसह कटलास एक्सप्रेस कवायतींमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांनी मोंबासा बंदरात केनिया, जिबौती, मोझांबिक, कॅमेरून आणि जॉर्जियाच्या तटरक्षक दलाच्या जवानांना प्रशिक्षण दिले. अतिरेक्यांच्या ठिकाणांवर प्रवेश करणे, अतिरेक्यांचा शोध घेणे, त्यांची साधनसामुग्री शोधून ती ताब्यात घेणे आदी प्रशिक्षण त्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT