मुंबई

खासदार नवनीत राणा यांच्या प्रकृतीबाबत लीलावती रुग्णालयाने दिली 'ही' माहिती

भाग्यश्री भुवड


मुंबई  :नागपूरच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना मुंबईतल्या लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती आता ठिक त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले असल्याची माहीती लिलावती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. खासदार नवनीत राणा यांच्या तब्येतीत कालच सुधारणा झाली होती. त्यांना आयसीयूमधून बाहेर हलवले होते. मात्र, काल रात्रीच नवनीत राणा यांच्यासह त्यांचे पती रवी राणा यांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याचे मुंबईच्या लिलावती रुग्णालयाचे पल्मुनरी फिजीशिअन डॉ. जलील पारकर यांनी सांगितले आहे.

नवनीत राणा यांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्यानंतर 13 ऑगस्ट या दिवशी त्यांना तातडीने नागपूरवरुन मुंबईच्या लिलावती रुग्णालयात हलवण्यात आले होते. राणा यांच्यावर गुरुवारपासून लिलावती रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमधून हलवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. खासदार नवनीत राणा यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 11 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये सासू सासरे, दोन मुलं, आमदार राणा यांचा समावेश आहे. 6 ऑगस्ट पासून नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवि राणा यांच्यावर नागपूरच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sion Bridge: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! सायन पूल वाहतुकीसाठी खुला होणार; प्रशासनाकडून तारीख आली समोर

Pune News: पुण्यातील उड्डाणपूल कार्यक्रमात प्रशासनाची घोडचूक! चूक दुरुस्त करण्यासाठी उभारलेल्या पुलाचे नावच चुकवलं; प्रकरण काय?

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Pune Crime: खेळ मांडला! एका महिन्यात विवाहितेचे लावले तीन लग्न; पुण्यातल्या रॅकेटचा पर्दाफाश

Treatment deadline: रुग्णालयात ३० मिनिटांत उपचार सुरू करणे बंधनकारक; नवीन आपत्कालीन नियमावली लागू, प्रशासनाचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT