मुंबई

आठ वर्षांनी मिळाले चोरीला गेलेले दागिने; दिव्यातील घाग कुटुबीयांना सुखद धक्का 

शर्मिला वाळुंज

ठाणे : तुमचे चोरीला गेलेले दागिने मिळाले असून कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात येऊन ते घेऊन जा, असा दूरध्वनी दिवा येथे राहणाऱ्या संदीप घाग यांना आला आणि त्यांना सुखद धक्काच बसला. लॉकडाऊनदरम्यान नोकरी गेल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या घाग यांनी आनंद व्यक्त केला असून लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले आहेत. 

दिवा येथे राहणारे संदीप घाग 2012 मध्ये काही कामानिमित्त कल्याणला आले होते. तेव्हा चोरट्यांनी त्यांच्याकडील 70 हजार रुपये किमतीचे दागिने चोरून पळ काढला होता. लोहमार्ग पोलिसांनी चोरट्यांना अटक केली आणि त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला होता. तपासाची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संदीप यांना ते दागिने परत करण्यात आले.

कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाल्मिक शार्दुल यांनी संदीप यांना दागिने लवकरात लवकर देण्यात यावेत, अशी सूचना पोलिस अधिकारी रवींद्र आव्हाड यांना केली होती. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांनी संदीप यांचा पत्ता शोधून त्यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून दागिने घेऊन जाण्याबाबत कळवले. त्यानुसार रविवारी आपल्या वडिलांसह लोहमार्ग पोलिस ठाण्यात जाऊन संदीप यांनी दागिने स्वीकारले. 
-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी खेळी! विराटच्या विक्रमाशी बरोबरी; भारताच्या विक्रमी धावा, इंग्लंडला रडू आवरेना

विद्यार्थ्यांसमोरच राडा! पालक सभेत शिक्षक-पालकांत उफाळला वाद; शालेय व्यवस्थापन समितीची निवडणूक रखडली

Pune Crime : पुणे मेट्रोसाठी गुंतवणुकीचे आमिष दाखवून दाम्पत्याला तब्बल ३ कोटी ७८ लाखांचा गंडा, दोघांवर गुन्हा दाखल

Ali Khamenei: खामेनेई यांच्या हत्येनंतर भारताकडून शोक व्यक्त; इराणच्या दूतावासात जाऊन शोकपुस्तिकेत स्वाक्षरी

Pune News : कमी दराच्या निविदांचा होणार बंदोबस्त; स्थायी समितीतील बैठकीमुळे ठेकेरादांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT