mumbai municipal and mhada sakal
मुंबई

Mumbai News : उपकर प्राप्त इमारतींतील अतिक्रमणांबाबत आता पालिका आणि म्हाडाची संयुक्त पथके

उपकरप्राप्त इमारतींची दुरुस्ती करताना मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - उपकरप्राप्त इमारतींची दुरुस्ती करताना मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत आहेत. त्याबाबत तक्रारी आल्यास त्या बांधकामाची तपासणी करण्यासाठी पालिका आणि म्हाडा यांची संयुक्त पथके आता तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

पालिकेने म्हाडाला अनधिकृत बांधकामांची तपासणी करण्यासाठी पथके नियुक्त करण्याबाबत सांगितले आहे. अनधिकृत बांधकामाची पाहणी करणाऱ्या पथकांमध्ये म्हाडाचे अधिकारी असायला हवेत. कारवाई करताना दोन्ही प्राधिकरणाची पथके आवश्यक असल्याचे पालिकेने पालिकेने म्हटले आहे.

उपकरप्राप्त इमारतींची दुरुस्ती करताना अंतर्गत आणि बाहेरून अनधिकृत बांधकाम होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्याबाबत पालिकेकडे तक्रारी आल्या आहेत. उपकरप्राप्त इमारतींमध्ये दुरुस्तीच्या नावाखाली बेकायदा बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. अतिक्रमणांवर कारवाईबाबत दोन्ही प्राधिकरणांचा समन्वय नाही. त्यामुळे पालिका आणि म्हाडा ही दोन्ही प्राधिकरणाची अधिकारी एकदुस-यावर जबाबदारी ढकलत आहेत.

अनधिकृत बांधकामाबाबत तक्रार आल्यास, पालिका प्रभागातील इमारत आणि कारखाने विभागाचे कर्मचारी आणि म्हाडाचे अधिकारी यांचा समावेश असलेली संयुक्त पथके त्या जागेला भेट देऊ शकतात आणि म्हाडाचे अधिकारी अनधिकृत बांधकाम सुरू आहे की नाही हे तपासू शकतात. आता संयुक्त पथक तैनात केल्यास योग्य कारवाई होऊ होवू शकते, असा विश्वास पालिकेच्या अधिका-यांना वाटत आहे.

म्हाडाला उपकरप्राप्त इमारतींच्या दुरुस्तीसाठी परवानगी देण्याचा अधिकार आहे. म्हाडाने कंत्राटदाराला कशाची परवानगी आहे आणि कशाची परवानगी नाही याबद्दल सूचना द्याव्यात. उपकरप्राप्त इमारतीत बेकायदा बांधकाम केले जाते, तेव्हा म्हाडाने परवानगी दिली आहे, असे सांगून पालिकेचे अधिकारी हात धुवून घेतात.

उपकरप्राप्त इमारतींमधील अनधिकृत बांधकामे तपासण्यासाठी म्हाडाकडे यंत्रणा आणि कर्मचारी नाहीत. त्यामुळे नव्याने तयार करण्यात येणारी संयुक्त पथके हे योग्य पाऊल आहे. म्हाडाने कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरावीत, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय गुरव यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT