kalyan crime sakal media
मुंबई

कल्याण : मुंगूसाची शिकार करणाऱ्या चौघांना अटक

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण फोर्टीस हॉस्पीटल (Fortis hospital) परिसरात मुंगूसची शिकार (Mongoose Hunt) केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. स्थानिक नागरिकांनी ही बाब बाजारपेठ पोलिसांच्या लक्षात आणून दिली. बाजारपेठ पोलीसांनी (kalyan police) याप्रकरणी चार जणांना अटक (culprit arrested) केली. कल्याण वन खात्याकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला असून आरोपींना पोलीस कोठडी (police custody) सुनावण्यात आली आहे.

मुंगूसचे तेल सांधेदुखीवर औषध म्हणून वापरले जाते. तसेच मुंगूसच्या केसाचा वापर ब्रश बनविण्यासाठी होतो. याला बाजारात चांगली किंमत मिळत असल्याने आरोपींनी मुंगूसची शिकार केली असावी असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

संजू समय्या मोटम (वय 32), भोलानाथ शंकर पास्तम (वय 30), जलाराम समय्या पास्तम (वय 32), बसवय्या शंकर पास्तम (वय 32) अशी अटक आरोपींची नावे आहेत. हे सर्व मांडा टिटवाळातील वासुंद्री रोड परिसरात राहणारे आहेत. आरोपींना एक दिवसीय वन खाते पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी रघुनाथ चन्ने यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT